India delivers over 4 Lakhs MT of fuel to Sri Lanka 
ग्लोबल

भारत श्रीलंकेला पुरवणार ४ लाख मेट्रिक टन इंधन

श्रीलंकेला भारतानं या काळात अनेक प्रकारची मदत केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : श्रीलंकेत निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक पेचप्रसंगात भारतानं आत्तापर्यंत मोठी मदत केली आहे. आता भारतानं इंधन पुरवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भारताकडून श्रीलंकेला सुमारे २ लाखांहून अधिक मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली आहे.

भारताकडून गुरुवारी श्रीलंकेला ६५,००० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनी खतं विभागाचे सचिव राजेशकुमार चतुर्वेदी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर खतं पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं पर्यटनावर आधारित आहे. पण इतर सर्व गोष्टींसाठी त्यांना आयातीवर अवलंबून रहावं लागतं. सध्या श्रीलंकेवर मोठं आर्थिक संकट ओढवलं असून परदेशी गंगाजळी संपली आहे. त्यामुळं त्यांना खाद्य पदार्थांपासून इंधन आणि इतर सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून रहावं लागत आहे. यापार्श्वभूमीवर शेजारील या देशाला हवी ती मदत देण्याची घोषणा भारतानं केली आहे.

भारतानं आजवर श्रीलंकेला तांदूळाची खेप पाठवली आहे. तसेच १८.५ हजार कोटी रुपयांची मदतही केली आहे. श्रीलंकेच्या पायाभूत सुविधा योजनांमध्येही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT