Israel Attack 
ग्लोबल

Israel Attack: इस्त्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर; मोदी सरकारकडून तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

कार्तिक पुजारी

तेल अविव- इस्त्रायलवर हमास दहशतवादी संघटनेने हल्ला केला आहे. परिस्थिती संघर्षमय झाली असून कधीही युद्धाची घोषणा होऊ शकते. या पाश्वभूमीवर इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांच्या पालक करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. (India issues advisory for its nationals in Israel amid Hamas terrorists' attack on Israel)

इस्त्रायलवर शनिवारी सकाळी चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना हल्ले करत आहे. सकाळच्या सुमारास दोन तासांमध्ये ५ हजार रॉकेट हल्ले झाल्याचं बोललं जातं. अनेक दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसले आहेत. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झालीये. यापार्श्वभूमीवर भारत सरकारकडून तेथील आपल्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

विनाकारण कुठेही बाहेर पडून नका, ज्या ठिकाणी सुरक्षित स्थळे आहेत त्याच ठिकाणी थांबा. तसेच काही मदतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या, असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. हमासच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत चार इस्त्रायली नागरिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीयांना खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

गाझा पट्टीतून इस्त्रायलच्या दिशेने रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. गाझा पट्टीमध्ये हमास दहशतवादी संघटनेचे राज्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हमास इस्त्रायल लष्कराशी लढत आहे. दोघांमध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे. यावेळी हमासने गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा हल्ला केल्याचं बोललं जातंय. इस्त्रायल युद्धाची तयारी करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT