Taliban Sakal
ग्लोबल

तालिबाननं काश्मीर प्रश्नावर पाजळलं ज्ञान; भारताला दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने प्रथमच काश्‍मीरच्या मुद्दावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘काश्‍मीर खोऱ्यातील समस्यांकडे भारताने सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे,’ असा अनाहूत सल्ला तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने दिला आहे.

पाकिस्तानमधील ‘एआरवाय न्यूज’ या खासगी वृत्तवाहिनीला मुजाहिद याने नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्याने विविध विषयांवर भाष्य केले. भारत व पाकिस्तानच्या वाढत्या तणावाचा उल्लेख करीत तो म्हणाला की, अण्वस्त्रसज्ज असलेल्या या दोन्ही देशांनी एकत्र बसून हा प्रश्‍न सोडवायला हवा. ते दोघेही शेजारी असून त्यांचे हित एकमेकांशी निगडित आहे. अफगाणिस्तानमध्ये भारताचे अन पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. ते भारताने पूर्ण करावेत, असे तालिबानने म्हटले होते. या अनुषंगाने बोलताना भारताने अफगाणी नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यानुसार धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा असल्याचे मुजाहिद म्हणाला.

हल्ल्याचा निषेध

काबूल विमानतळाबाहेर झालेल्‍या आत्मघाती हल्ल्यांचा मुजाहिदने निषेध केला. तो म्हणाला की, ज्या भागात बाँबस्फोट झाला तेथे अमेरिकी सैन्याचे नियंत्रण आहे. आमची संघटना या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आहे.

इस्लामवर आधारित सरकार

अफगाणिस्तानमध्ये लवकरच सर्वसमावेशक प्रशासन स्थापन केले जाईल. त्यात सर्व अफगाणींचा समावेश असेल. अफगाणिस्तानमधील सरकार बळकट व इस्लाम धर्मावर आधारित असावे, असे आम्हाला वाटते. आम्ही त्यादृष्टिने काम सुरू केले आहे. जोपर्यंत मजबूत व स्थिर सरकार स्थापन करण्यास आम्हाला यश येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू, असे मुजाहिदने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT