india-pakistan e sakal
ग्लोबल

तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही, भारताने पाकिस्तानला खडसावले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) बुधवारी भारताने पाकिस्तान (Pakistan) आणि ऑर्गनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनवर (OIC) भारताने जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तानला खोटे बोलण्याची सवय झाली असून ते परिषदेमध्ये भारताबाबत अपप्रचार करत असल्याचे म्हटले. तसेच काश्मीरचा मुद्दा उपस्थित होताच, भारताला अयशस्वी आणि दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून धडे घेण्याची गरज नाही, अशा शब्दात पाकिस्तानला खडसावले.

जिनेव्हा येथे भारतीय अभियानाचे सचिव पवन बधे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. परिषदेला माहिती आहे की पाकिस्तान मानवाधिकारांचं उल्लंघन करत असून त्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानात त्यांच्या अधिकृत परिसरात शिख, हिंदू आणि ईसाई समाजाच्या लोकांवर अत्याचार होत आहेत. मात्र, पाकिस्तान सरकार ते थांबवू शकत नाही. पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायाच्या महिला आणि मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. मात्र, पाकिस्तान गप्प बसला आहे, असेही बध म्हणाले.

भारताने ऑर्गनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशनवर निशाणा साधला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतातील अंतर्गत मुद्द्यांवर ओआयसीला बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा हल्लाबोल केला. ओआयसीने असहायपणे स्वतःला पाकिस्तानमध्ये ओलिस ठेवण्याची परवानगी दिली आहे असेही भारताने म्हटले आहे. यूएनएचआरसीच्या ४८ व्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर घणाघाती हल्ला चढवत, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना खुलेआम समर्थन देणारा, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि शस्त्रे पुरवणारा देश म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले आहे असे म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT