ग्लोबल

भारत-अमेरिकादरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

वृत्तसंस्था

ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना जयशंकर भेटले

वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांची भेट घेत दहशतवादाचा सामना आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासंबंधी चर्चा केली.

जयशंकर आणि मॅकमास्टर यांच्यातील यांच्यातील चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहाच दिवसांपूर्वी मॅकमास्टर यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जयशंकर यांनी "हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'चे अध्यक्ष पॉल रायन यांच्याशीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारत व अमेरिकेमधील आर्थिक व संरक्षणात्मक भागीदारीचा आणखी विकास करण्याच्या दृष्टिकोनामधून संवेदनशील असलेल्या मुद्यांसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली. अमेरिकेतील कॅन्सास येथे श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणास ठार करण्यात आल्यासंदर्भातही रायन यांनी या वेळी शोक व्यक्त केला.

रायन व मॅकमास्टर यांच्यासहित जयशंकर हे ट्रम्प प्रशासनामधील अन्य उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जयशंकर यांनी केलेला हा तिसरा अमेरिका दौरा आहे. ट्रम्प यांचे भारतविषयक धोरण अद्यापी पुरेसे स्पष्ट झालेले नाही. भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासहित एकंदरच भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सध्या एका महत्त्वपूर्ण वळणावर असताना जयशंकर यांचे हे अमेरिका दौरे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा
जयशंकर आणि मॅकमास्टर यांच्या दरम्यान सुरक्षा, दहशतवादाचा सामना आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी या महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT