S. Jaishankar Sakal
ग्लोबल

India Vs Canada : भारत कॅनडाचा खरा चेहरा आणणार जगासमोर ; एस. जयशंकर बोलणार संयुक्त राष्ट्रात ?

S. Jaishankar at the United Nations...

Chinmay Jagtap

India Vs Canada :

खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत असलेल्या कॅनडाचा खरा चेहेरा जगासमोर आणण्यासाठी भारत सज्ज झाला असून स्वतः परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर हे बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करणार आहेत .

यावेळी कॅनडियन पंतप्रधानांनी केलेल्या निज्जर याच्या हत्येसाठी भारतीय एजन्सी जबाबदार आहेत या आरोपांना प्रत्युत्तर देतील असे म्हटले जात आहे.

या भाषणामध्ये ते खलिस्तान प्रश्नावरून कॅनडावर शाब्दिक हल्ला चढवू शकतात आणि कशाप्रकारे दहशतवाद्यांचे पालन पोषण कॅनडा करत आहे हे पुराव्यानिशी सांगतील असे म्हटले जात आहे.

निज्जरयाच्या हत्येसाठी कॅनडाने भारताला जबाबदार ठरवले आहे. मात्र याचा कोणताही पुरावा अजूनही देऊ ते शकले नाहीयेत. अशाावेळी कॅनडाच्या राजकारणात खलिस्थानी गटांचे वर्चस्व असल्याने ते हे आरोप करत आहेत असे म्हटले जात आहे.

तर दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान हे निज्जर याच्या हत्येत कोण कोणते भारतीय शामिल आहेत हे सांगतील असे म्हटले जात आहे. यामुळे नक्की येत्या काळात काय होते हे पाहणे अतिशय उत्सूकतेचे ठरणार आहे.

कॅनडाने खलिस्तानी घटकांचे पालन-पोषण केल्याचा आरोप भारत अनेक वर्षापासून करत आहे. यातच निज्जर हा एक त्याचं मोठं उदाहरण आहे.

2018 मध्ये भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना एक यादी सादर केली होती. भारत विरोधी कारवाया करणाऱ्या घटकांचा उल्लेख त्यात होता. ज्यात निज्जरचा देखील समावेश होता. मात्र कॅनडाने आजपर्यंत कोणावरही कोणतीही कारवाई केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT