Anosh Thakkar saving Indian in Ukraine Sakal
ग्लोबल

Russia Ukraine War: जीव धोक्यात घालून भारतीय व्यावसायिकाने वाचवले शेकडोंचे प्राण

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना गुजराती व्यावसायिकाने मदतीचा हात दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु होऊन सहा दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाने युक्रेनमध्ये हल्ला केल्यामुळे भारतासह अनेक देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. परंतु अनोश ठक्कर नावाचा एक गुजराती व्यावसायिक पोलंड सीमेवर भारतीय तसेच युक्रेनियन लोकांना वाचवण्यासाठी धडपडत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनोश ठक्कर (Anosh Thakkar) गेल्या चार दिवसांपासून युक्रेनच्या सीमेवर क्रॉसिएन्को एन पोलंडजवळ (Kroscienko n Poland) तळ ठोकून आहे. (Indian businessman Anosh Thakkar from Amsterdam extends help on Poland border.)

नेदरलँड्समधील अ‍ॅमस्टरडॅमधीलमधील आपल्या अलिशान घरात बसून फक्त देणगी देऊन मदत करण्यापेक्षा हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून अनोश ठक्करने थेट पोलंड गाठलं. आपला आराम आणि सुरक्षितता धोक्यात घालून तो पोलंडच्या सीमेवर मोठ्या संख्येने येणा-या भारतीयांना तसेच युक्रेनियन लोकांना वाचवण्यासाठी झटत आहे. अनोश ठक्करने युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या शेकडो युक्रेनियन आणि भारतीय नागरिकांना बाहेर काढून सुखरूप पोलंड सीमेवर पोहोचवलं आहे.

"सुरुवातीला मी माझ्या फर्मच्या युक्रेनमधील शाखेत काम करणाऱ्या लोकांना मदत केली. माझा युक्रेमध्ये व्यवसाय असल्यामुळे माझा तेथील अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क होता. त्यामुळे तिथे जाऊन संकटात सापडलेल्या भारतीय आणि युक्रेनियन लोकांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला,'' असं अनोश ठक्करने सांगितले. अनोश ठक्करने वडोदरा येथे शिक्षण घेतलं आहे.

''ज्यांनी नुकतंच कीव्ह सोडलं आहे. अशा भारतीय विद्यार्थ्यांना नीट वागणूक मिळत नसल्याचं मला माहिती झालं. त्यामुळे मी आणि माझा भागीदार पॅट्रिक हार्टने युक्रेनशी संपर्क सुरु केला. आणि पोलंड सीमेवरील सुरक्षित भागात त्यांना बसद्वारे पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे औषधोपचार आणि अन्नाची सोयही केली,'' असंही अनोश ठक्कर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT