Indian businessman Gupta Brothers arrested in UAE esakal
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचाराचा आरोप; भारतीय उद्योगपतींना यूएईमध्ये अटक

सकाळ डिजिटल टीम

गुप्ता बंधू 24 वर्षांपूर्वी सहारनपूरहून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते.

अबू धाबी : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भारतीय उद्योगपती गुप्ता ब्रदर्स (Gupta Brothers) यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) अटक करण्यात आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं सोमवारी सांगितलं की, संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी गुप्ता कुटुंबातील राजेश गुप्ता (Rajesh Gupta) आणि अतुल गुप्ता (Atul Gupta) यांना अटक केली. या दोघांविरुद्ध इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेचं सरकार दोघांच्याही प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

गुप्ता बंधू 24 वर्षांपूर्वी सहारनपूरहून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथं त्यांनी चांगला जम बसवला आणि त्यांचा व्यवसाय फळाला आला. त्यानंतर ते देशातील पहिल्या दहा श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांपैकी एक बनले. पण, माजी राष्ट्रपती झुमा यांच्या जवळ असल्याचा आणि राजकीय फायद्यासाठी त्यांचा व्यवसाय चालवल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच केला जायचा.

दक्षिण आफ्रिकेतील भ्रष्टाचाराबाबत एका अहवालानं पुष्टी केलीय की, गुप्ता ब्रदर्सच्या मालकीचं 'द न्यू एज' हे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रानं सरकारी मालकीच्या उद्योगांमधून कोट्यवधी रुपये लाटले होते. शिवाय, माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांचीही मदत केली होती, असा आरोपही त्यांच्यावर आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सहारनपूर येथील अजय, अतुल आणि राजेश या तीन गुप्ता बंधूंनी टीएनए सुरू केला होता, जो तेव्हापासून बंद आहे. हे तिघं भाऊ सध्या दुबईत राहत होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केलीय, जेणेकरून त्यांच्यावरील गुन्हेगारी आरोपांची सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT