तिरंग्याचा आधार घेऊन युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलेले पाकिस्तानी विद्यार्थी  
ग्लोबल

Ukraine Crisis : पाकिस्तानी विद्यार्थ्यांना तिरंग्यानी वाचविले

पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थीही आपआपल्या देशात परतत आहेत

सकाळ डिजिटल टीम

गेले काही दिवस रशिया - युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी शिक्षण, नोकरीसाठी जातात. या युद्धाचे परिणाम विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहे. विद्यार्थ्यांना युद्धजन्य परिस्थीतीतून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा मोहिमेद्वारे विशेष विमानाची सोय केली. या विमानातून हजारो विद्यार्थी भारतात परतत आहेत. युक्रेनच्या शेजारील देशांमधून एअर इंडिया, स्पाइस जेट आणि इंडिगोची विमाने सातत्याने भारतात येत आहेत. भारताबरोबरच पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थीही आपआपल्या देशात परतत आहेत. भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट पर्यंत सुरक्षितपणे पार करण्यास मदत झाली.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी यापूर्वी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांच्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार भारतीय विद्यार्थ्यांनी असे झेंडे लावले. पण, पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थीही आता असे झेंडे लावत आहेत, असे युक्रेनमधून रोमानियातील बुखारेस्ट शहरात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले.

भारतीय झेंडा नेला तर अडचण नाही

दक्षिण युक्रेनमधील ओडेसा येथून आलेल्या पाकिस्तानच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला युक्रेनमध्ये सांगण्यात आले की ,जर भारतीय ध्वज घेऊन गेलो तर आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी भारतीय ध्वज बनविण्यासाठी बाजारातून भारतीय ध्वजाच्या रंगाचे स्प्रे आणि पडदा विकत घेतला आणि भारतीय तिरंगा स्प्रेने रंगवला, असे एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी युक्रेनजवळील ओडेसा येथून बस बुक केली. त्या बसवर भारतीय तिरंगा लावला. आणि तेथून मोल्दोव्हान सीमेवर आले. मोल्दोव्हानच्या स्थानिकांनी या विद्यार्थ्यांना रोमानियाला जाण्यासाठी मदत केली. तसेच भारतीय दूतावासानेही आम्हाला मदत केली. तसेच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली. या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना युक्रेनधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी भारतीय तिरंग्याने मदत केल्याने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT