ग्लोबल

युक्रेनमध्ये अडकलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीची धडपड; म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

किव्ह : रशियाच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा (Operation Ganga) सुरु केले आहे. आतापर्यंत कित्येक भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात परतले आहे, पण युक्रेनमध्ये अडकलेल्या एका भारतीय नागरिकाने (Indian Citizen)भारतातमध्ये परत येण्यास नकार दिला आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे धोका वाढत असूनही हा व्यक्ती भारतात परत येण्यास नकार देत आहे. त्यामागील कारण देखील तेवढेच भावूक करणारे आहे.

किव्ह सोडून लविवमध्ये झाला स्थायिक

यूक्रेनमध्ये अडकलेल्या व्यक्तीची पत्नी गर्भवती आहे आणि भारतीय नागरिक नाही. त्यामुळे तिला भारतात आणता येणार नाही. याच कारणामुळे हा व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीला एकटीला सोडून भारतामध्ये येण्यास नकार देत आहे. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सुरक्षित ठिकाणी पोहचलेल्या गगन यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंब आणि ८ महिने गर्भवती पत्नीला सोडून युक्रेनमध्ये सोडून नाही जाऊ शकत. त्यामुळे सर्व जण पोलंडला जात आहे. सध्या ते लविवमध्ये एका मित्राच्या घरी राहात आहे.

पायी चालण्याची भारतीयांवर आली वेळ

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीपासून भारत सरकारचे ऑपरेशन गंगा सुरु केलेल आहे. युक्रेनच्या सरकारने नागरिकांनी फ्लाईट्ससाठी आपले एअरस्पेसला बंद केले आहे, ज्यामुळे पोलंड रोमानिया, स्लोवाकिया, हंगरी आणि माल्दोवा सारख्या शेजारील देशांमध्ये पोहचण्यासाठी भारतीय लोकांवर पायी चालण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी पोहचून ते फ्लाईटासाठी भारत पोहचू शकतील.

मदतीसाठी ४ मंत्री उपस्थित

युक्रेनचे शेजारील देशांमध्ये स्थायिक भारतीय दूतावासांद्वारे युद्धग्रस्त परिसरातील नागरिकांना बाहेक काढण्यासाठी युक्रेन सीमेवर चौक्या उभारण्यात आल्या आहेत आणि एअर इंडिया आणि इंडियन एअर फोर्सच्या फ्लाईट्स मार्फत त्यांनी भारत पुन्हा परत आणले आहे. ऑफरेशन गंगासाठी केंद्र सरकारचे ४ मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंह पूरी, वी के सिंह आणि किरेन रिजीजू स्वत: युद्धग्रस्त क्षेत्रामध्ये पोहचले आहे.

एवढे भारतीय नागरिक परतले

भारतीय विदेश मंत्रालयने आतापर्यंत ७६ स्पेशल फ्लाईट्समार्फत युक्रेनमध्ये अडकलेल्या १५९२० नागरिकांना भारतामध्ये आणले आहे. शनिवार आणि रविवारी १३ फ्लाईट्स नवी दिल्ली आणि मुंबई पोहचल्या. यामध्ये साधारण दिड हजार लोक भारतामध्ये परतले. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला जर एक विद्यार्थी गोळी लागल्यामुळे गंभीर स्वरूपामध्ये जघमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

Roads Length Dispute: पुण्यात रस्त्यांची लांबीवर गोंधळ: पथ विभाग म्हणतो २३७१ किमी, घनकचरा विभागाचा दावा तब्बल ६८९२ किमी

POCSO Justice: पॉक्सो प्रकरणांतील चिमुकल्यांना जलद न्याय : सात वर्षांहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांची विशेष नियुक्ती

SCROLL FOR NEXT