Indian Missiles esakal
ग्लोबल

भारताचं क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडलं, अमेरिकेनं दिला थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

चीन, भारत आणि पाकिस्ताननं शत्रूंना दूर ठेवण्यासाठी अण्वस्त्रं विकसित केली आहेत.

अमेरिकेनं (America) नुकताच एक अहवाल जारी केलाय. यात त्यांनी म्हटलंय चीन (China), भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) नेत्यांना आण्विक देशांमधील युद्धाचे धोके आणि परिणामांची चांगली जाणीव आहे. दक्षिण आशियातील वाढत्या राष्ट्रवादामुळं युद्धाची ठिणगी पडू शकते, असं अहवालात म्हटलंय. हा अहवाल यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसनं (US Institute of Peace, USIP) तयार केलाय.

या अहवालात मार्च 2022 मध्ये पाकिस्तानी हद्दीत भारतीय क्षेपणास्त्र (Indian Missiles) चुकून पडल्याच्या घटनेचाही उल्लेख करण्यात आलाय. अहवालात दक्षिण आशियातील बदलत्या परिस्थितीमुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा घेण्यात आलाय. यासोबतच भारत-पाकिस्तान (India-Pakistan Dispute) यांच्यातील आण्विक धोका कमी करण्यावर भर देण्याचं आवाहन अमेरिकेला करण्यात आलंय.

अमेरिकेला भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं अहवालात सांगितलंय. USIP अहवालात बायडन प्रशासनाला तालिबानसोबत चालू असलेल्या चर्चेचा उपयोग अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील प्रादेशिक स्थिरतेला धोका कमी करण्यासाठी करण्यात आलाय. चीन, भारत आणि पाकिस्ताननं शत्रूंना दूर ठेवण्यासाठी अण्वस्त्रं विकसित केली आहेत. परंतु, सुरक्षेबाबत नेहमीच शंका उपस्थित केल्या जात असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT