Crime News 
ग्लोबल

Crime : पाच कोरियन तरुणींवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय वंशाचा तरुण दोषी; ड्रग्ज देऊन...

रवींद्र देशमुख

मेलबर्न : सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

राजकीय व्यक्तींशी संबंध असलेल्या ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा प्रमुख सदस्य बालेश धनखर याच्यावर जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या बलात्काराच्या ३९ आरोपांवर १३ आरोपांवर खटला चालवण्यात आला होता. सोमवारी सिडनीच्या जिल्हा न्यायालयातील ज्युरीने त्याला सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे.

हेराल्डच्या वृत्तानुसार, ज्युरीच्या फोरमनने 'दोषी' ठरवल्यानंतर ४३ वर्षीय बालेशला रडू कोसळलं होतं. मे महिन्यात त्याला पुन्हा कोर्टाला सामोरे जावे लागेल आणि वर्षाच्या अखेरीस त्याला शिक्षा सुनावली जाईल. बालेश ऑस्ट्रेलियात डेटा एक्स्पर्ट म्हणून काम करत होता.

कोरियन भाषांतरासाठी बनावट नोकऱ्यांची जाहिरात करून तो तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवत. तरुणींना भेटण्यासाठी तो हॉटेल, कॅफे आणि कोरियन रेस्टॉरंटचा वापर करत असे. त्यानंतर तो तरुणींना सिडनी सीबीडीमधील आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये खोट्या बहाण्याने घेऊन जायचा, असा युक्तीवाद कोर्टात कऱण्यात आला.

सरकारी वकिलांनी सांगितले की, धनखर हा वाइन आणि इतर पेयांमध्ये स्लीपिंग ड्रग स्टिलनॉक्स किंवा डेट रेप ड्रग रोहिप्नॉलच्या गोळ्या टाकायचा. धनखड याने आपल्या बेडसाईड अलार्म घड्याळात लपवलेल्या कॅमेऱ्यात आणि मोबाइलमध्ये बलात्काराचे चित्रीकरण केले होते, जे पोलिसांनी जप्त केले.

ऑक्टोबर २०१८ मध्ये पोलिसांनी धनखर याच्या अपार्टमेंटची झडती घेतली असता, त्यांना विविध महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे ४७ व्हिडिओ सापडले, त्यापैकी काही महिला बेशुद्ध अवस्थेत होत्या, तर काही जणी धडपडत होत्या. विवाहबाह्य संबंध तुटल्यानंतर आपण एकटे पडलो म्हणून महिलांशी खोटं बोललो, असं धनखरने आपल्या बचावात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Officer Accident : कोल्हापूरच्या पोलिस अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कर्नाटकात घटना

Backwater Tourism: पर्यटन प्रेमींसाठी खास! भारतातील या ठिकाणी मिळतो हाऊसबोट स्टेचा आनंद

Premanand Maharaj: देव स्वतः आपल्याला पाप करण्यापासून का रोखत नाही? ; प्रेमानंद महाराजांनी रहस्य उलगडलं

कमळी मालिकेतील अन्नपूर्णा आजीची हटके लव्हस्टोरी, 'बायोलॉजी शिकवत होते पण आयुष्याची केमिस्ट्री जुळली' म्हणाल्या...

IND vs NZ ODI Series : भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून रिषभ पंत बाहेर, कारणही आलं समोर...

SCROLL FOR NEXT