India Replace Western Companies Russia  Sakal
ग्लोबल

'युद्धामुळे पाश्चिमात्य कंपन्यांचा रशियाला रामराम, भारतीय फार्मा कंपन्या घेणार जागा'

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनने हल्ला (Ukraine Russia War) केल्यामुळे पाश्चिमात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य कंपन्यांनी रशियन बाजारपेठेतून (Russian Market) माघार घेतली आहे. आता भारतीय फार्मा कंपन्या (Indian Pharma Company) या पाश्चिमात्य कंपन्यांची जागा घेऊ शकतात, असे रशियाचे नवनियुक्त राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. याबाबत स्पुतनिक वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.

''भारत फार्मसीमधील जागतिक बाजारपेठ आहे. तसेच भारत मूळ औषधांच्या दर्जाचं असणाऱ्या स्वस्त दरातील जेनेरिक औषधांचा अग्रगण्य निर्माता आहे. युद्धामुळे पाश्चिमात्य कंपन्यांनी रशियन बाजारपेठेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या रिकाम्या असलेल्या जागा भारतीय कंपन्यांना देण्यात येतील. इथं भारत औषधनिर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकेल'', असं अलीपोव्ह यांनी म्हटलं

रशियाने युक्रेनवर हल्ला केला. रशियाच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी अनेक बैठका झाल्यात. पण, भारताने प्रत्येकवेळी तटस्थ भूमिका घेतली. पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादत आहेत. पण, भारताने कोणाच्याही बाजूने न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. या युद्धात रशियाच्याविरोधात बाजू मांडण्यासाठी अमेरिकेचा भारतावर प्रचंड दबाव आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या खासदारांनी भारताने रशियाविरोधात बोलावं असा आग्रह धरला होता. पण, भारत अद्यापही आपल्या भूमिकेवर कायम आहे.

अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियन तेल आणि वायू कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाच्या तेलाची मागणी घटली आहे. परिणामी रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देण्याचा प्रस्ताव दिला होता. आता भारताने हा प्रस्ताव स्वीकारला असून कच्चे तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, भारताच्या या निर्णयाविरोधात अमेरिका इतर देशांच्या नेत्याशी चर्चा करत असल्याची माहिती व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT