Indian Student Killed in US  Esakal
ग्लोबल

अमेरिकेत PhD करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; दोन आठवड्यानंतरही कारवाई नाही

गेल्या वर्षी आदित्यला एका रिसर्च प्रोजेक्टसाठी स्कॉलरशिप देखील मिळाली होती.

रोहित कणसे

अमेरिकेतील ओहायो मध्ये एका २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यी कारमध्ये मृत अवस्थेत आढळला . हा तरुण सिनसिनाटी विद्यापीठात शिकत होता. विद्यार्थ्याचं नाव आदित्य अदलखा असे असून ओहायो येथील डब्लूएलडब्लूटी वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिनसिनाटीच्या वेस्टर्न हिल्स वायाडक्ट वर आदित्य गाडी चालवत असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचा मृतदेह कारमध्ये आढळला असून त्या कारने दुसऱ्या एका कारला धडक दिली होती. ड्रायव्हिंग सीटच्या खिडकीतून तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे देखील पोलिसांना अढळून आले.

हॅमल्टन काउंटी कोरोनर ऑफिसने सांगितले की, गोळीबार झाल्यानंतर यूसी मेडिकल सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी आदित्यचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

आदित्यने नवी दिल्लीतील रामजस कॉलेज मधून झूलॉजीमध्ये पदवी घेतली होती. त्यानंतर एम्समधून फिजिओलॉजी मध्ये मास्टर डिग्री मिळवून अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी गेला होता. २०२५ मध्ये तो आपली पीएचडी पूर्ण करणार होता. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार आदित्यला मागील वर्षी अल्सरेटिव्ह कोलाइटिसवर एक रिसर्च प्रोजेक्टसाठी स्कॉलरशिप देखील मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT