samosa 
ग्लोबल

भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने अंतराळात पाठवला समोसा; VIDEO VIRAL

सकाळ डिजिटल टीम

लंडन - अंतराळ संशोधन संस्था अंतराळात एखादे यान पाठवताना त्यात प्रयोग म्हणून कधी प्राणी, वस्तू पाठवतात. त्या वातावरणात यावर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी असं केलं जातं. मात्र सध्या अंतराळात पाठवण्यात आलेला समोसा ट्रेंड होत आहे. याला कारणही असंच आहे. ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटने अंतराळात समोसा पाठवला होता. पण अंतराळात पोहोचण्याआधीच तो फ्रान्समध्ये तो पडला. 

बाथमधील लोकप्रिय असं चायवाला रेस्टॉरंट आहे. चायवाला रेस्टॉरंटच्या भारतीय मालकाने अंतराळात समोसा पाठवण्यासाठी तीनवेळा प्रयत्न केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आहे.

चायवालाचे मालक नीरज यांचं म्हणणं आहे की, जगात आनंद पसरवण्याच्या उद्देशाने त्यांच्या मनात समोसा अंतराळात पाठवण्याचा विचार आला होता. एकदा मजेतच सर्वांना म्हटलं होतं की अंतराळात समोसे पाठवेन. निराशेच्या काळातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं एक कारण बनला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

रेस्टॉरंटचे मालक नीरज यांनी समोसे पाठवण्यासाठी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला होता. तीनवेळा त्यांनी असा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला होता. दुसऱ्यावेळी फुग्यात पुरेसं हेलियम नव्हतं. तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात फुग्यासह समोसा अंतराळात सोडताना दिसत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT