Siblings Day sakal
ग्लोबल

Siblings Day : इथे प्रत्येक कुटुंबात जन्माला येतात जुळी भावंडे; काय आहे रहस्य ?

कोडिन्ही हे जुळी मुले जन्माला येणारे जगातील एकमेव गाव आहे. इथल्या २००० कुटुंबांमध्ये ५५० जुळे आहेत.

नमिता धुरी

मुंबई : आजच्या महागाईच्या काळात पालकांना एक मूल सांभाळणंही कठीण होतं. अशा वेळी जुळं होणं म्हणजे एकाच वेळी आश्चर्य, आनंद आणि चिंतासुद्धा. या तिहेरी भावनाकल्लोळाच्या अनुभव केरळमधील गाव गेली कित्येक वर्षे घेत आलं आहे.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील कोडिन्ही या गावात बहुतांशी कुटुंबांमध्ये जुळी मुलेच जन्माला येतात. सध्या या गावात ५५० जुळी मुले आहेत. यामागचे शास्त्रीय कारण आजही संशोधकांना समजू शकलेले नाही. (indian village of twins only twins born in kodinhi kerala Siblings Day mysterious Siblings story )

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

कोडिन्ही हे जुळी मुले जन्माला येणारे देशातील एकमेव गाव आहे. इथल्या २००० कुटुंबांमध्ये ५५० जुळे आहेत. २००८ साली या गावात २८० जुळे होते. त्यानंतर यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

या गावातील बहुतांश मुले १५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. येथील एका शाळेत ८० जुळी मुले आहेत. देशात १००० मुलांमागे जुळ्यांचे प्रमाण ९ आहे. कोडिन्ही गावात हेच प्रमाण ४५ आहे.

याबाबतीत हे गाव जगात दुसऱ्या तर आशियात पहिल्या स्थानावर आहे. जगात पहिला क्रमांक नायजेरियातील इग्बोओरा या गावाचा लागतो. येथे दर १००० मुलांमागे १४५ जुळे मुले जन्माला येतात.

कोडिन्हीमधील ६५ वर्षीय अब्दुल हमीद आणि त्यांची बहीण कुन्ही कदिया ही सर्वांत मोठी जुळी भावंडे आहेत. त्यांच्या जन्मानंतर या गावात जुळ्यांचं प्रमाण वाढलं.

गावात अशाप्रकारे जुळी मुलंच का जन्माला येतात हे जाणून घेण्यासाठी २०१६ साली काही संशोधकांची टीम येथे पोहोचली होती. यात केरळ, जर्मनी आणि लंडनच्या संशोधकांचा सहभाग होता. मात्र आजतागायत या रहस्याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

गावातील जुळ्यांपैकी निम्मी मुले गेल्या १० वर्षांत जन्माला आलेली आहेत. त्यामुळे कोडिन्ही गावात फिरताना शाळेत, बाजारात किंवा इतर कुठेही एकपेक्षा अनेक जुळ्यांचे दर्शन घडतेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT