india flag sakal
ग्लोबल

भारताचे यूएनमधील भाषण

दहशतवादाचा निवडक विचार नको ‘यूएन’च्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क: पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि याबाबत दुटप्पी भाषा करणाऱ्यांविरोधात देखील बोलायचे धाडस असणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका भारताने आज मांडली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आज ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवादी कृत्यांमुळे निर्माण झालेला धोका’ या विषयावर परिसंवाद पार पडला, त्यात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उपरोक्त मत मांडले. शेजारील इराकमध्ये इसीसचा प्रसार होऊ लागला असून हक्कानी नेटवर्कच्या कारवायांमुळे जगाच्या चिंता वाढल्या आहेत.

अफगाणिस्तान असो अथवा भारत लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद या दहशतवादी संघटना तेथे सक्रिय असल्याचे जयशंकर म्हणाले. सध्या आपण ज्या समस्येला सामोरे जात आहोत तिच्याबाबत सुरक्षा परिषदेला निवडक, सोयीचा विचार करून आत्मसंतुष्ट होता येणार नाही. दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्यांच्या स्त्रोतांकडे देखील डोळेझाक करणे शक्य नाही असेही त्यांनी नमूद केले.

अफगाणिस्तानातील ताजा घटनाक्रम जगाची चिंता वाढविणारा असून तेथे तालिबानी सत्ताधीश बनल्याने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

प्रार्थना बेहरेचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'सखे गं साजणी' सिनेमाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांना उत्सुकता

SCROLL FOR NEXT