Is Indias water blocked answer given by Bhutan 
ग्लोबल

भारताचे पाणी अडवले का? भूतानने दिले हे उत्तर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून आसाममधील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नसून, भूतानमधून येणाऱ्या नद्यांचे पाणी भूतानने रोखल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावर आज भूतानने प्रतिक्रिया दिली असून, आम्ही भारताचे पाणी रोखले नसून नदी पात्रांच्या दुरुस्तीमुळे प्रवाहाला अडचणी निर्माण झाल्याचा दावा केला आहे. 

चला वारीला : धावला अश्व, रंगली उडी, आठवणीत रमले सारे सवंगडी
आसाममधील बक्सा जिल्ह्यातील २५ पेक्षा जास्त गावांमधील जवळपास सहा हजार शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता भूतानमधील डोंग प्रकल्पावर अवलंबून आहेत. १९५३ पासून बक्सामधील शेतकरी सिंचनासाठी भूताननमधील नद्यांच्या पाण्याचा वापर करत आहेत. शेतीची कामे सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शेतकरी भारत-भूतान सीमेवर जाऊन नदीचे पाणी आसामला मिळेल याची व्यवस्था करतात; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूतानने परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश नाकारला असल्याने पाणी मिळणार नसल्याची शंकाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, काही दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने भूतानने पाणी रोखल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये याठिकाणी झालेल्या पावसामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नद्यांची देखभाल व्यवस्थित करता आली नव्हती. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. यासाठी नदी पात्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने प्रवाहात अडचणी आल्या असून, आम्ही कोणाचेही पाणी रोखलेले नाही. याउलट आसाममधील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भूतानने शुक्रवारी स्पष्ट केले.

ओसामा बिन लादेन हुतात्मा; इम्रान खान यांचं संसदेत खळबळजनक वक्तव्य
दरवर्षी या हंगामात भारताचे शेतकरी भारत भूटान सीमेवरील समद्रूप जोंगखार भागात जातात आणि काला नदीचे पाणी त्यांच्या शेताकडे वळवतात. यावर्षी भूतानने कोरोना व्हायरसमुळे भारतीय शेतकऱ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. आता शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल पाळले जात आहेत तर जलसिंचनात काय अडचण आहे. यावर अद्याप राज्य किंवा केंद्र सरकार यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT