India Russia transport
India Russia transport sakal
ग्लोबल

चीनच्या BRI ला INSTC उत्तर; भारत-रशियाच्या दळणवळणाचा वेळ झाला कमी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेच्या आक्षेपानंतरही भारत आणि रशिया यांच्यातील व्यापाराला गती मिळणार आहे. दोन्ही देशांमधील व्यापारासाठी कमी अंतराचा नवीन मार्ग विकसित करण्यात आला आहे. इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) नावाच्या या कॉरिडॉरद्वारे रशियाने भारताला पहिली खेपही पाठवली आहे, जी आत्ता इराणपर्यंत पोहोचली आहे.

चीनच्या बेल्ट एंड रोड इनिशिएटिव (BRI) ला उत्तर म्हणून पाहिले जाणारे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडोर (INSTC) कार्यान्वित झाले आहे. रशियन ट्रेनने भारतासाठी पाठवलेली मालाची पहिली खेप मंगळवारी इराणमध्ये पोहोचली आहे.आता तेथून समुद्रमार्गे भारतात येईल. रशियाने शनिवारी सेंट पीटर्सबर्ग येथून भारतासाठी मालाची ही खेप पाठवली आहे. जी कॅस्पियन समुद्रातील अस्तरखान बंदरातून इराणमधील आंजली बंदरात पोहोचली. तेथून अब्बास बंदरमार्गे भारताच्या पश्चिम टोकाच्या बंदरात पोहोचेल. युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे रशियाबरोबरच्या व्यापारावर लादलेल्या पाश्चात्य निर्बंधांवर नजर टाकली तर, या निर्बंधांना झुगारून परस्पर व्यापार सुरू ठेवण्यामध्ये भारत, रशिया आणि इराणचे हे मोठे यश म्हणूनही INSTC ला पाहिले जाऊ शकते.(International North-South Transport Corridor)

मालवाहतुकीसाठीचा वेळ जवळपास निम्म्याने कमी होईल

रशियातून पाठवलेला माल भारतात पोहोचायला २५ दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल. पूर्वी भारत आणि रशिया दरम्यान माल पोहोचण्यासाठी 40 दिवस लागत होते. इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) चे वैशिष्ट्य हे आहे की, ते रशिया आणि भारत यांच्यातील व्यापारात वेळेची बचत करते, परंतु सध्याच्या भौगोलिक-राजकीय(Geo-political challenges) आव्हानांमध्ये हा सर्वात सोपा पर्याय आहे. तसेच, या मार्गामुळे भारत आणि रशियामधील व्यापारावरील खर्च सुमारे 30% कमी होईल.

INSTC चा मार्ग

नॉर्थ-साउथ ट्रांसपोर्ट कॉरिडोर (उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग) ची स्थापना 12 सप्टेंबर 2000 रोजी भारत, रशिया आणि इराण यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे करारावर स्वाक्षरी केल्यानंतर झाली आहे. त्याचा उद्देश सदस्य देशांमधील वाहतूक सुलभ करणे हा आहे. हा कॉरिडोर हिंद महासागर आणि पर्शियन आखात यांना इराणमार्गे कॅस्पियन समुद्राला जोडतो. तेथून कॉरिडोर सेंट पीटर्सबर्ग आणि रशियन फेडरेशनमधून जात युरोपच्या उत्तरेकडील भागाकडे पोहचतो.

INSTC प्रकल्पामध्ये 13 देशांचा सहभाग

पाच वर्षांनंतर, 2005 मध्ये अजरबैजान देखील या करारात सामील झाला. या प्रकल्पामध्ये आता अजरबैजान, बेलारूस, बल्गेरिया, आर्मेनिया, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ओमान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्की आणि युक्रेन या 13 देशांचा समावेश आहे. उत्तर-पश्चिम युरोपसाठी रशियन फेडरेशन, काकेशससाठी पर्शियन गल्फ (पश्चिमी मार्ग), मध्य आशियासाठी पर्शियन आखात (पूर्व मार्ग), कॅस्पियन समुद्रासाठी इराण पर्शियन आखात (केंद्रीय मार्ग) मिळून हा प्रकल्प पूर्ण करतात.

रेल्वे, रस्ता, बंदर या तिन्ही मार्गांनी होणार व्यवसाय

7,200 किमी लांबीच्या या वाहतुकीच्या जाळ्यामध्ये सागरी, रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. हा भारत आणि रशियामधील सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. आता भारत आणि इराण यांना INSTC ला इराणच्या चाबहार बंदराशी जोडायचे आहे जे भारतासाठी अफगाणिस्तान आणि तेथून मध्य आशियामध्ये जाण्याचा मार्ग आहे.

भारत आणि रशिया दरम्यान या मार्गावरून दरवर्षी 20 ते 30 दशलक्ष टन मालवाहतूक होऊ शकते. सध्या या मार्गावर भारत इराण आणि अजरबैजानमार्गे रशियाशी व्यापार करेल. हा मार्ग मुंबई, मॉस्को, तेहरान, बाकू, बंदर अब्बास, अस्त्रखान, आंजली इत्यादी मोठ्या शहरांना जोडणारा आहे.

आईएनएसटीसी, अस्गाबात एग्रीमेंट (Ashgabat Agreement)च्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेच्या विकासासाठीही ते उपयुक्त ठरेल. भारत, ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान यांनी आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि ट्रान्झिट कॉरिडोरच्या तयारीसाठी अस्गबात करारावर स्वाक्षरी केली आहे. मध्य आशिया आणि पर्शियन आखात दरम्यान मालवाहतूक सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT