Khalistani 
ग्लोबल

Insulting Tricolor: खलिस्तान्यांकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान; फुटबॉलसारखी केली टोलवाटोलवी

हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडातील संबंध तणावाचे बनले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कॅनडातील खलिस्तान्यांकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या लोकांनी एका फुटबॉलला तिरंगा गुंडाळून पायानं त्याची टोलवाटोलवी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचंही बोललं जात आहे. (Insulting Indian National Flag by Khalistanis in Canada playing like Football video goes viral)

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये कॅनडातील खलिस्तानी समर्थक शीख लोक राष्ट्रध्वजाचा फुटबॉल करुन खेळताना दिसत आहेत. एका आंदोलनादरम्यान ते हे कृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात खलिस्तानचे झेंडे असून स्पिकरवरुन ते भारतासंदर्भात काही घोषणाबाजी करताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

जुना व्हिडिओ असल्याची माहिती

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये युजर्सनी संताप व्यक्त केला असून हे अत्यंत चुकीचं कृत्य असल्याचं म्हटलं आहे. ही खूपच लाजीरवाणी बाब असून कॅनडातून कोणालाही भारतात येऊ देता कामा नये. कॅनडातच या लोकांनी वेगळा खलिस्तान तयार करावा अशा स्वरुपाच्या कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

तसेच हा जुना व्हिडिओ असल्याचंही काहींनी म्हटलं आहे. न्यूज चेकर्स या वेबसाईटनं या व्हिडिओची फॅक्ट चेक केलं असून हा व्हिडिओ ३१ जुलै २०२३ रोजीचा असल्याचं म्हटलं आहे.

कॅनडात तिरंगा जाळला

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी खलिस्तान समर्थक आंदोलकांनी कॅनडात भारतीय ध्वज जाळला तसेच पंतप्रधानच्या कटआउटला जोडे मारो आंदोलन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Latest Marathi News Update : सासवडमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

निवेदिता सराफच्या आईला पाहिलत का? अभिनेत्री दिसते सेम आईसारखी, Photo Viral

Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT