International Democracy Day: esakal
ग्लोबल

International Democracy Day: लोकशाहीत देशाप्रती आपली जबाबदारी काय?

अनेक राजकीय मतभेद आणि टीका टिपण्यांनंतरही भारतात यशस्वीरित्या लोकशाही पद्धती चालत आलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Democracy: आज १५ सप्टेंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. १५ वर्षापासून जगभऱ्यात १५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत, जगातील लोकशाही देशांनी एकत्र येऊन लोकशाही देशांना प्रोत्साहन देण्यासाठी व लोकशाहीला बळ देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याच्या ठरावाला अनुमती दिली होती. (International Democracy Day know your responsibility towards nation)

भारत जगातील सगळ्यात मोठे लोकशाही पद्धतीने चालणारे राष्ट्र आहे. अनेक राजकीय मतभेद आणि टीका टिपण्यांनंतरही भारतात यशस्वीरित्या लोकशाही पद्धती चालत आलेली आहे. लोकशाहीमध्ये फक्त लोकच शासन सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.

देशाप्रती आपली जबाबदारी

लोकशाहीत खरं तर प्रथम जबाबदारी ही जनतेवर असते. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या उमेदवारावर देशाची धूरा असते. त्यामुळे उमेदवार निवडून दिल्यानंतर आपण सगळी जबाबदारी ही नेत्यांवर ढकलून देऊ शकत नाही. समाजाला आणि राष्ट्राला उत्तम नेते मिळवून देणं हे कर्तव्य लोकांचे आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे लोकशाहीत जेवढी जबाबदारी नेत्यांची आणि प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी आपलीसुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT