International Family Day Sakal
ग्लोबल

International Family Day: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन जगभरात साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

International Family Day: दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन जगभरात साजरा केला जातो. कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्यात कोणी कितीही यशस्वी झाला तरी कुटुंबाशिवाय त्याला यशाचा आनंद घेता येत नाही. त्याच्या मनात कुठे ना कुठे एकटेपणाची भावना असते. कारण कुटुंबात राहणार्‍या व्यक्तीला आपले सुख-दुःख कसे वाटून घ्यायचे हे माहीत असते, परंतु विभक्त कुटुब संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करणे महत्त्वाचे मानले जाते.

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनाचा इतिहास (History of International Family Day)-

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. जगभरातील लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन साजरा करण्याचा उद्देश (Importance of International Family Day):

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणे. कोणाला एकटेपणा वाटू देऊ नका. कुटुंब एकत्र असेल तर भावनिक नातं जोपसणं आवश्यक आहे. कोणाचेही कुटुंब कोणत्याही कारणाने तुटू नये म्हणून आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. तरुणांना कुटुंबाचे महत्त्व समजावे, चांगल्या-वाईटात प्रियजनांच्या पाठीशी उभे राहावे, हाच हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: आज कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT