International Plastic Bag Free Day 2024 esakal
ग्लोबल

International Plastic Bag Free Day 2024: 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन', जाणून घ्या या दिवसाचे महत्व

Plastic Bag free World: बिघडते पर्यावरण जगासाठी धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या कुजण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, ज्या पर्यावरणासाठी गंभीर समस्या निर्माण करत आहे. त्यामुळे प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी ३ जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सकाळ डिजिटल टीम

International Plastic Bag Free Day: बिघडते पर्यावरण जगासाठी धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या कुजण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, जे पर्यावरणासाठी गंभीर समस्या निर्माण करत आहे. त्यामुळे प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी ३ जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन (International Plastic Bag Free Day) म्हणून साजरा करण्यात येतो. (Latest Marathi News)

या दिवशी प्रदुषणामुळे उद्भावणाऱ्या समस्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जातात. जगात बऱ्याच देशांनी प्लास्टिक वापरावर बंदी केली आहे.

प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी- कधी, कुठे आणि का?

२००९साली पश्चिम युरोपमध्ये प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी लावायला सुरु केली. यानंतर २०१३ या वर्षी बॅग्स फ्री वर्ल्ड ऑर्गनायझेशन या संस्थेने आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन साजरा करायला सुरुवात केली आणि हा दिवस जगभरात लोकप्रिय होत गेला.(Latest Marathi News)

२०१५ मध्ये युरोपियन युनियनने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी पहिले पाऊल उचलले. २०२२मध्ये सिंगला यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणणारा बांगलादेश पहिला देश बनला. भारतामध्येही सिंगल यूज प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे.

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाचे महत्व-

प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी त्याचा कमीत कमी वापर करणे खूप महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन या दिवशी प्लास्टिकबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी जगभरात संदेश दिले जातात. प्लास्टिकऐवजी दुसऱ्या पर्यायांच्या वापराबद्दल प्रेरित केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT