ग्लोबल

सौरमालेबाहेरील रेडिओ सिग्नल प्रथमच टिपला; ५१ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहातून उत्सर्जन 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाला आपल्या सौर यंत्रणेबाहेरील रेडिओ सिग्नल टिपण्यात प्रथमच यश आले आहे. पृथ्वीपासून सुमारे ५१ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाने हा रेडिओ सिग्नल उत्सर्जित केला आहे. नेदरलॅंडसमधील लो फ्रिक्वन्सी ॲरे (लोफर) या दुर्बिणीने हा सिग्नल टिपला. ताऊ बूट्‌स या प्रणालीतून हा सिग्नल उत्सर्जित झाला होता. 

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांच्या पथकाने इतर संभाव्य रेडिओ उत्सर्जनाचेही निरीक्षण केले. ‘ॲस्ट्रॉनॉमी ॲंड ॲस्ट्रोफिजिक्स’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी सातत्याने केलेल्या निरीक्षणातून हा सिग्नल सौरमालेबाहेरील संबंधित ग्रहातून आल्याचे स्पष्ट झाले. या सिग्नलमुळे सौरमालेबाहेरील दूरवरच्या ग्रहाकडे पाहण्याची एक नवीन प्रकारची खिडकीच संशोधकांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे, त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधासाठीही नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध झाल्याचा संशेधकांचा दावा आहे. संबंधित ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या निरीक्षणातून ग्रहाची अंतर्गत रचना व वातावरण समजून घेण्यास मदत होईल, असाही संशोधकांचा विश्वास आहे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिचे सौरवाऱ्यांच्या धोक्यापासून रक्षण करते. त्यामुळे, पृथ्वी सजीव जीवसृष्टीस अनुकूल बनते. त्यामुळे, या नव्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनही त्यावरील जीवसृष्टीबद्दल समजू शकते. पृथ्वीसारख्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्रही अशा प्रकारे बाह्य धोक्यापासून त्या ग्रहाचे व वातावरणाचे रक्षण करू शकते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘गुरू’च्या संशोधनाचा फायदा 
कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी दोन वर्षांपूर्वी गुरू ग्रहाच्या रेडिओ सिग्नलचे निरीक्षण केले होते. त्यांनी पृथ्वी किंवा आपल्या सौरमालेपासून दूर असलेल्या ग्रहांकडून उत्सर्जित हाणाऱ्या संभाव्य रेडिओ सिग्नलसाठी त्यांनी हा अभ्यास केला. त्याचा फायदा त्यांना या नव्या ग्रहाचा रेडिओ सिग्नल टिपण्यात झाला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हा रेडिओ सिग्नल पृथ्वीपासून अतिशय दूर असलेल्या ताऊ बूट्‌स या प्रणालीतून उत्सर्जित झालेला आहे. या प्रणालीत तारे व ग्रहांचाही समावेश आहे. 
जेक डी. टर्नर, संशोधक, कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT