third world war maths formula goes viral 
ग्लोबल

तिसरं महायुद्ध होणारा का? Viral होतंय गणित!

पॅट्रिक बेट-डेव्हिड यांनी दोन महायुद्धांचा संदर्भ जोडला आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धाचे परिणाम युक्रेनला भोगावे लागत आहेत. या युद्धाबाबत, बाबा वेंगांपासून अनेकांच्या भविष्यवाण्या या काळात व्हायरल झाल्या आहेत. मात्र एका व्यक्तीने पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या तारखा, दुसरे महायुद्ध आणि युक्रेनवरील रशियन आक्रमण यांच्यातील संबंध लक्षात घेतला आहे. या सर्व तारखांची संख्या एकत्र केल्यास ६८ अंक येतो आहे. काही लोकांना हा फॉर्म्युला पाहून आश्चर्य वाटले तर काहींना अजूनही यावर विश्वास बसलेला नाही.

पॅट्रिक बेट-डेव्हिड (Patrick Bet-David) यांनी २८ जुलै १९१४ ही तारीख बघितली. या दिवशी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. त्यांनतर पॅट्रिकने ७, २८, १९, १४ अंक एकत्र केले त्याची बेरीज ६८ आली. यानंतर त्यांनी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याची तारीख घेतली - १ सप्टेंबर १९३९. तीही संख्या. ६८ आली.

पुतिन यांनी या दिवशी केली होती युद्धाची घोषणा

पेट्रिक यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाची तारीख पाहिली. ही तारीख होती २४ फेब्रुवारी २०२२. त्याची एकूण बेरीज २४+२+२०+२२ = ६८ आहे. तारखांमधील संबंध सारखा असल्याचे सांगतपॅट्रिकने ट्विट केले की, 'माझ्यासाठी हे एक गणितीय सूत्र असून हा प्रकार विचित्र आहे.' हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, १२,००० हून अधिक लाईक्स आणि ३५०० हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT