imran khan esakal
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांना मोठा दिलासा! तोशाखाना प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टाने दिली स्थगिती

इम्रान खान यांच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हाय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांच्या शिक्षेला इस्लामाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (IHC) पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिली आहे.(Latest Marathi News)

तोशाखाना प्रकरणात तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे इम्रानचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Latest Marathi News)

विशेष म्हणजे, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (IHC) आज सोमवारी तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान खानच्या तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्याच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला होता. आयएचसीचे मुख्य न्यायाधीश आमिर फारूक आणि न्यायमूर्ती तारिक महमूद जहांगिरी यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

एका ट्रायल कोर्टाने 5 ऑगस्ट रोजी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख खान यांना दोषी ठरवून या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. खान यांच्यावर 2018-2022 च्या कार्यकाळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांच्यावर पाच वर्षांची राजकारणात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सार्वत्रिक निवडणुकीतही ते भाग घेऊ शकणार नाहीत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT