Russia putin Esakal
ग्लोबल

इस्लामिक स्टेट आणि रशियाचा शत्रू एकच, पण तरी मॉस्कोवर हल्ला का झाला? 1400 वर्षांचा आहे इतिहास

Islamic State and Russia history: इस्लामिक स्टेट देखील अमेरिका आणि पश्चिमी देशांचा द्वेष करते. त्यामुळे प्रश्न असा पडतो की इस्लामिक स्टेटने रशियावर हल्ला का केला?

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नुकताच एक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिट स्टेटने घेतली आहे. रशिया हा अमेरिका आणि पश्चिमी देशांना विरोध करणारा देश आहे. इस्लामिक स्टेट देखील अमेरिका आणि पश्चिमी देशांचा द्वेष करते. त्यामुळे प्रश्न असा पडतो की इस्लामिक स्टेटने रशियावर हल्ला का केला? यासंदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटची विचारधारा माहिती असणाऱ्या तज्ज्ञांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणतात की, इस्लामिक स्टेट रशियाला देखील आपला शत्रूच समजतो. रशिया हा एक ख्रिश्चन बहुल देश आहे. याठिकाणी ख्रिश्चनांचे मत महत्त्वाचे आहे. (Islamic State and Russia have same enemy but why was Moscow attacked 1400 years of history)

गेल्या १४०० वर्षांपासूनचा संघर्ष

गेल्या १४०० वर्षांपासून इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये अनेकवेळा संघर्ष घडला आहे. पाकिस्तानपासून नायजेरियापर्यंत विविध प्रदेशात भीषण युद्ध झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बहुसंख्य असलेले देश आणि इस्लामचा प्रभाव असलेले देश असे दोन गट पडलेले आहेत.

इस्लामिक स्टेट रशियाला ख्रिश्चन देशांचा घटक मानतो. अधिकृतरित्या सर्व ख्रिश्चन देशांची आघाडी नसली. तरी, अल-कायदासह इतर इस्लामिक दहशतवादी संघटना याचा धोका जाणतात. त्यामुळे भारत, रशिया सारखे देश कायम इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर राहिले आहेत.

सीरियातील असद सरकारला रशियाचे समर्थन

रशिया, भारत, ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्ससह इतर काही देशातील मुस्लिम दहशतवादी बनण्यासाठी इस्लामिक स्टेटचा भाग बनले आहेत. इस्लामिक स्टेट खुरासन प्रोवियन्स ज्याला ISKP म्हटलं जातं इस्लामिक स्टेटचा एक भाग आहे. या संघटनेमध्ये मध्य आशियातील अनेक तरुण सहभागी झाले आहेत. यात तत्कालीन सोवियत संघातील देशांचा देखील समावेश होतो.

इस्लामिक स्टेटला वाटतं की रशिया हा इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे रशियाविरोधात जिहाद पुकारण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत. 'द गार्डियन'च्या एका रिपोर्टमध्ये आणखी एका महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करण्यात आला आहे. सीरियामधील बशर अल असद सरकारला पुतिन यांचा पाठिंबा आहे. इस्लामिक स्टेट असद सरकारला विरोध करते. त्यामुळे देखील इस्लामिक स्टेट चिडला आहे.

१९९९ मध्ये रशियाकडून चेचेन्यामध्ये रक्तरंजित युद्ध लढण्यात आले होते. त्याचा राग देखील अनेक इस्लामिक देशांमध्ये आहे. तसेच, १९८० मध्ये रशियाचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये पोहोचलं होतं. इस्लामिक देशांविरोधातील हे पाऊल होतं असं अनेकजण मानतात. त्यामुळेच रशिया आणि इस्लामिक स्टेटचा शत्रू एक जरी असला तरी धर्माच्या मुद्द्यावरुन रशिया वेगळा पडतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT