Israel-Hamas
Israel-Hamas Google file photo
ग्लोबल

इस्त्रायलचा मोठा एअरस्ट्राईक; ४० मिनिटात डागल्या ४५० मिसाइल

वृत्तसंस्था

हमासविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षामध्ये इस्त्रायलला मदत झाली ती आयर्न डोम एरियल डिफेंस सिस्टीमची. या आयर्न डोममुळे इस्त्रायलने हमासची सर्व रॉकेट्स हवेतल्या हवेतच नष्ट केली.

जेरुसलेम : इस्त्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईनची (Palestine) कट्टर दहशतवादी संघटना हमासमधील (Hamas) संघर्ष थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. गुरुवारी (ता.१३) रात्री इस्त्रायलने हमासच्या तळांवर जोरदार हल्ला चढविला होता. जवळपास ४० मिनिटाच्या आतच इस्त्रायलने ४५०हून अधिक मिसाईल डागल्या होत्या. या हल्ल्यावेळी हमासच्या १५० पेक्षा अधिक ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं होतं. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मिसाईल हल्ला होता, असं इस्त्रायलच्या डिफेंस फोर्सने स्पष्ट केलं आहे. (Israel attack on hamas with more than 450 missiles in 40 minutes)

हमासविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षामध्ये इस्त्रायलला मदत झाली ती आयर्न डोम एरियल डिफेंस सिस्टीमची. या आयर्न डोममुळे इस्त्रायलने हमासची सर्व रॉकेट्स हवेतल्या हवेतच नष्ट केली. तर मिसाइलच्या साहाय्याने गाझा पट्टी भागातील अनेक इमारतींना नुकसान पोहोचवले आहे.

इस्त्रायलच्या सेनेने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील १११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३१ मुले आणि १९ महिलांचा समावेश आहे. गेल्या ४ दिवसांत इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इतके मृत्यू झाले आहेत. काही ठिकाणी यहुदी आणि अरबी लोकांमध्ये संघर्ष पेटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात ८०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझा हेल्थ मिनिस्ट्रीने दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी इस्त्रायल आणि हमासला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या देशांना शांततेचे आवाहन केले आहे. मॅक्रॉन यांनी अरबी आणि हिब्रू अशा दोन्ही भाषेत वेगवेगळे ट्विट करत तत्काळ शांतता राखण्यासाठी आवाहन केलं आहे. मध्य पूर्वेतील दोन्ही देशांमध्ये हिंसा थांबली पाहिजे. मी युद्ध समाप्त करून संवाद सुरू करण्याची मागणी करतो. शांतता आणि सौहार्दाची मी मागणी करत आहे.

मात्र आतापर्यंत इस्त्रायल आणि हमासकडून शांतता राखण्याबाबतची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत. आक्रमणाची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT