Israel Hamas war esakal
ग्लोबल

इस्राइलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३ हजार ९०० मुलांचा मृत्यू, प्रत्येक १० मिनिटांमध्ये एकाचा जीव जातोय; 'गाझा'चा दावा

संतोष कानडे

Israel Hamas war Updates : इस्राइलकडून गाझामध्ये होत असलेल्या हल्ल्ल्यांमध्ये आतापर्यत ३ हजार ९०० लहान मुलांचा मृत्यू झाला असून प्रत्येक १० मिनिटांमध्ये एकाचा मृत्यू होतोय; असा खळबळजनक दावा हमासद्वारे गाझामध्ये चालवण्यात येत असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालिन केंद्राने केला आहे.

या आरोग्य केंद्राचे निर्देशक मोआतोसेम सलाह यांनी रविवारी यासंदर्भात एक विधान केलं आहे. सलाह म्हणाले की, इस्राइलने गाझावर हल्ला सुरु केला तेव्हापासून आतापर्यंत ३९०० बालकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय ८ हजार ६७ मुलं जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १२५० मुलं अजूनही बेपत्ता आहेत. इस्राइलच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्के मुलं असल्याचा दावा त्यांनी केलाय.

७ ऑक्टोबरला हमासने इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलकडून गाझावर बॉम्बवर्षाव सुरु आहे. हमासच्या हल्ल्यात १४०० लोक मृत झाले होते आणि २३९ लोकांचं अपहरण करण्यात आलेलं होतं.

दुसरीकडे गाझाच्या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इस्रायली युद्ध विमानांनी रविवारी गाझापट्टीतल्या एका शरणार्थी शिबिरावर हल्ला केला. त्यात कमीत कमी ४० जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झालेत.

एकीकडे अमेरिकेने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी इस्रायलला काही काळासाठी हल्ले रोखण्याचं आवाहन केलं होतं. परंतु इस्रायचं म्हणणं आहे की, गाझामधील हमास शासकांना चिरडून टाकण्यासाठी आमचे हल्ले सुरुच राहतील. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, फ्रान्सची राजधानी पेरिस, जर्मनीची राजधानी बर्लिन आणि आणखी युरोपीय शहरांमध्ये फिलिस्तानी समर्थक हजारो लोकांनी गाझामधील इस्रायली हल्ले रोखण्याची मागणी केली आहे.

गाझाच्या आरोग्य विभागाने बालकांच्या मृत्यूच्या केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांचे एवढे मृत्यू खेदजनक असल्याचं सांगितलं जातंय. जगभरातून इस्राइलवर दबाव वाढत असला तरी गाझावरली हल्ले रोखले जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT