israel hamas war  sakal
ग्लोबल

Israel–Hamas war : इस्राईलवर पुन्हा रॉकेट हल्ला; 'हल्ले थांबवा नाहीतर दुसरे युद्ध उत्तर सीमेवर....' दिला थेट इशारा

लेबनॉनमधील दहशतवादी संघटनेने सोमवारी इस्राईलच्या उत्तर भागातील एका हवाई तळावर रॉकेट हल्ला केला. या रॉकेट हल्ल्यात या तळाचे किरकोळ नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

तेल अविव : लेबनॉनमधील दहशतवादी संघटनेने सोमवारी इस्राईलच्या उत्तर भागातील एका हवाई तळावर रॉकेट हल्ला केला. या रॉकेट हल्ल्यात या तळाचे किरकोळ नुकसान झाले. इस्राईलने मात्र हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून पुन्हा असा हल्ला झाल्यास दुसरे युद्ध उत्तर सीमेवर होईल, असा सज्जड दम भरला आहे.

हिज्बुल्ला आणि हमास या एकमेकांना सहकार्य करणाऱ्या दहशतवादी संघटना आहेत. गाझा पट्टीतील युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधून हिज्बुल्लानेही हल्ले सुरू केले होते. हल्ले सातत्याने होत असले तरीही काही रॉकेट हल्ले आणि सीमेवरील गोळीबार एवढेच मर्यादित त्याचे स्वरूप होते.

मागील आठवड्यात मात्र इस्राईलने लेबनॉनची राजधानी बैरूत येथील एका इमारतीवर लक्ष्यभेदी हल्ला करत हमासच्या एका मोठ्या म्होरक्याला ठार मारले होते. तेव्हापासून हिज्बुल्लाने हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून त्यांनी इस्राईलच्या हवाई नियंत्रण तळावर रॉकेट हल्ला केला.

त्यामुळे इस्राईलच्या लष्करप्रमुखांनी हिज्बुल्लाला इशारा दिला आहे. या संघटनेने हल्ले करणे थांबवावे अन्यथा गाझा पट्टीनंतर दुसरे युद्ध उत्तर सीमेवर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. हिज्बुल्लाची युद्ध करण्याची क्षमता हमासपेक्षाही अधिक चांगली आहे. मात्र, ‘आमचा संयम संपत चालला असून राजनैतिक मार्गाने हा प्रश्‍न सुटला नाही तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल,’ असे इस्राईलने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT