Israel hamas war idf soldiers body cam footage rescued around 250 hostages alive 60 hamas terrorists killed  
ग्लोबल

Israel-Hamas War : इस्रायली सैन्याकडून 250 ओलिसांची सुटका, 60 हमास दहशतवादी ठार; लाइव्ह ऑपरेशनचा व्हिडीओ केला जारी

इस्त्राइल आणि पॅलेस्टाइन यांच्यात संघर्ष सुरू असून संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.

रोहित कणसे

इस्त्राइल आणि पॅलेस्टाइन यांच्यात संघर्ष सुरू असून संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. यादरम्यान इस्त्रइलच्या लष्कराने ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी संघटना हमासविरोधात करण्यात आलेल्या एका कारवाईचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये इस्त्राइली डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)चे जवान ओलीस ठेवलेल्या लोकांना हमासच्या तावडीतून सोडवताना दिसत आहेत.

या लष्करी जवानांचे बॉडी कॅम फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आले आहे. आयडीएफने यासोबत माहिती दिली की, इस्त्राइली सेनेने गाझा सेक्योरिटी फेन्सच्या जवळ एक लाइव्ह ऑपरेशन करत हमास दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या २५० जणांची सुटका केली. यादरम्यान हमासच्या ६० हून अधिक दहशतवाद्यांना देखील ठार करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं.

आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर रोजी सूफा सैन्य चौकीवर ताबा मिळवण्यासाठी प्लेटिला १३ यूनिट (आयडीएफची तुकडी) ही गाझा सेक्योरिटी फेन्सजवल तैनात करण्यात आली होती. या जवानांनी जवळपास २५० ओलिसांची सुटका केली आहे. यादरम्यान ६० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. ज्यामध्ये हमास दक्षिणी नौदल डिव्हीजनचा उप कमांडर मोहम्मद अबू अली देखील होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT