Israel-Hamas War  sakal
ग्लोबल

Israel-Hamas War News : इस्राईलकडून गाझामध्ये हमासची कोंडी; सर्व बाजूंनी वेढा; हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी हल्ल्यांत वाढ

‘‘गाझामधील दाट वस्ती असलेल्या भागात इस्रायली सैनिक लढत आहे,’’ असे सैन्यदलाचे प्रमुख

सकाळ वृत्तसेवा

खान युनिस - हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत जमिनीवरील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यांच्या पायदळाने शहराला चारही बाजूंनी वेढा दिला आहे. हमासला उखडून टाकण्यासाठीच्या कारवाईतील हा केंद्रबिंदू आहे. जमिनीखालील भुयारांचे जाळे, बंकर आणि हमासच्या दहशतवाद्यांना संदेश देणारी केंद्रे उखडून लावण्यात येत आहे.

‘‘गाझामधील दाट वस्ती असलेल्या भागात इस्रायली सैनिक लढत आहे,’’ असे सैन्यदलाचे प्रमुख हर्झी हॅलेव्ही यांनी सांगितले. इस्राईलच्या सैन्याचे प्रवक्ते रेअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, की इस्रायली सैनिक दहशतवाद्यांशी आमने-सामने लढत आहेत. हवाई हल्ले आणि आवश्‍यकतेनुसार तोफगोळ्यांचा माराही करण्यात येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांच्या खातमा इस्राईल करीत असून अभियांत्रिकी उपकरणांसह त्यांच्या पायाभूत सुविधाही नष्ट केल्या आहेत.

इस्राईलने गाझाबरोबरच जेनिन शहरावरही हल्ले केले. गाझावर सात ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले, की आम्ही युद्धाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. आम्हाला मोठे यश मिळाले असून गाझा शहरात आम्ही आणखी पुढे सरकलो आहोत.

हमासचा मुख्य नेता इस्माईल हनियेह त्याच्या खासगी विमानाने इराणच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी करीत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गाझात पायदळाने सुरू केलेल्या मोहिमेत इस्रायली सैन्याचेही मोठे नुकसान झाले असून गुरुवारी (ता.२) हमासचा सामना करताना त्यांच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला. ही कारवाई सुरू केल्यापासून ३२ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

ब्लिंकन यांची भेट

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचे शुक्रवारी इस्राईलमध्ये आगमन झाले. इस्रायली सैन्याने सर्व बाजुंनी वेढलेल्या गाझामध्ये अधिकाधिक मानवतावादी मदत पुरविण्यास परवानगी देण्याची त्यांची मागणी आहे. हमासने हल्ला केल्यापासूनचा ब्लिंकन यांचा हा तिसरा इस्राईल दौरा आहे. तेल अविव आणि जॉर्डनमधील अम्मानला त्यांनी आज भेट दिली.

मानवतावादी दृष्टिकोनातून हे युद्ध तात्पुरते थांबवावे, ही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची सूचना अमलात आणावी, पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पुरविणे आणि युद्धात जखमी झालेल्या आणखी विदेशी नागरिकांना गाझातून बाहेर पडण्यास परवानगी मिळविणे हे ब्लिंकन यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट होते. युद्ध तात्पुरते थांबविण्याच्या बायडेन यांच्या सूचनेला इस्राईलने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळणारे नेतान्याहू यांनी ‘आम्ही पुढे जात आहोत काहीही आम्हाला रोखू शकणार नाही,’ असे स्पष्ट केले आहे.

युद्धाच्या आघाडीवरून

गेल्या दोन दिवसांत ८०० विदेशी नागरिक गाझातून बाहेर पडले आहेत

युद्ध सुरू झाल्यापासून गाझात नऊ हजार पॅलिस्टॅनी ठार. इस्राईलमध्ये चौदाशे नागरिक ठार

गाझातील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २५ दिवसांत तीन हजार ७०० पॅलेस्टिनी मुलांचा युद्धात मृत्यू

गाझात अन्न व औषधांच्या पुरवठ्यासाठी इस्राईलकडून २६० हून अधिक ट्रकना परवानगी दिली असली तरी ती पुरेशी नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचे म्‍हणणे

गाझात इंधन पुरवठ्यास इस्रायली अधिकाऱ्यांचा नकार

युद्धाच्या आघाडीवरून

गेल्या दोन दिवसांत ८०० विदेशी नागरिक गाझातून बाहेर पडले आहेत

युद्ध सुरू झाल्यापासून गाझात नऊ हजार पॅलिस्टॅनी ठार. इस्राईलमध्ये चौदाशे नागरिक ठार

गाझातील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २५ दिवसांत तीन हजार ७०० पॅलेस्टिनी मुलांचा युद्धात मृत्यू

गाझात अन्न व औषधांच्या पुरवठ्यासाठी इस्राईलकडून २६० हून अधिक ट्रकना परवानगी दिली असली तरी ती पुरेशी नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचे म्‍हणणे

गाझात इंधन पुरवठ्यास इस्रायली अधिकाऱ्यांचा नकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT