Six Days War
Six Days War eSakal
ग्लोबल

Israel June War : एकाच वेळी 8 मुस्लिम राष्ट्रांनी केला हल्ला, तरीही जिंकलं इस्राइल! अवघ्या 6 दिवसांत संपवलं होतं युद्ध

Sudesh

हमास दहशतवादी संघटनेने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर, आता या देशाने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्राइलच्या संरक्षण मंत्र्यांनी आपल्या सैनिकांना पूर्ण सूट दिली आहे. तसंच, आपण गाझा पट्टीचा चेहराच बदलून टाकू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इस्राइलच्या या इशाऱ्यानंतर आता हमासचं काही खरं नाही, हे तर स्पष्टच झालं आहे. याला कारण म्हणजे इस्राइलचा इतिहास. अवघी 98 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने एके काळी आपल्या सर्वच शेजारी राष्ट्रांना घाम फोडला होता.

इस्राइलची गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सगळ्यात शक्तिशाली आणि खतरनाक मानली जाते. जगभरात कुठल्याही ठिकाणी आणि कितीही अवघड ऑपरेशन पार पाडण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. यासोबतच इस्राइलच्या सैन्याकडे असलेली हायटेक टेक्नॉलॉजी देखील जगभरात चर्चेचा विषय आहे.

इस्राइलचा वाद

इस्राइल हा एक ज्यू देश आहे. मात्र त्याच्या आजूबाजूला सर्व मुस्लिम राष्ट्र आहेत. या मुख्य कारणामुळे इस्राइलच्या सर्व बाजूंनी असलेल्या सुमारे 13 देशांशी त्यांचे वाद आहेत. इजिप्त, इराक, अल्जेरिया, कुवैत, सीरिया, जॉर्डन, लेबनन, लीबिया, मोरक्को, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन, सूदान आणि ट्यूनिशिया हे सर्व देश इस्राइलवर हल्ला करण्यासाठी टपून असतात.

जून वॉर

1967 साली यातील आठ देशांनी मिळून इस्राइलवर हल्ला करण्याची योजना आखली होती. 27 मे 1967 रोजी इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल नासिर यांनी इस्राइलला संपवण्याचा प्लॅन बनवल्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी अरब देशांची मदत घेतली होती. यानंतर दोनच दिवसात इजिप्त आणि जॉर्डनमध्ये एक करार झाला, ज्यानुसार दोन्हीपैकी कोणत्याही देशाने इस्राइलवर हल्ला केला; तर दुसरा देश त्याला साथ देईल. यानंतर जूनमध्ये इजिप्तने इस्राइलवर हल्ला केला.

दोन दिवसातच इजिप्तच्या साथीला इराक, कुवैत, सीरिया, सौदी अरेबिया, सूदान, अल्जेरिया आणि अर्थातच जॉर्डन हे देश आले. या सर्वांनी जॉर्डनमध्ये आपला मिलिट्री बेस उभारला. आणि मोठ्या हल्ल्यासाठी तयारी सुरू केली. मात्र, 5 जून रोजी इस्राइलने स्वतःच पहिला हल्ला करत इजिप्तचे सुमारे 400 फायटर जेट उद्ध्वस्त केले. यामुळे इतर देशांनीही घाबरुन माघार घेतली, आणि अवघ्या सहा दिवसांमध्येच हे युद्ध संपुष्टात आले.

आठ देशांना फोडला घाम

5 ते 10 जून या काळात पार पडलेल्या या युद्धाला 'जून वॉर' किंवा 'सिक्स डेज वॉर' म्हणूनही ओळखलं जातं. या युद्धामध्ये इस्राइलच्या सुमारे एक हजार सैनिकांचा बळी गेला होता, तर चार हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले होते. मात्र, शत्रू राष्ट्रांच्या मृत आणि जखमी सैनिकांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त होती. या युद्धामध्ये इजिप्तचे 15 हजार, जॉर्डनचे 6 हजार तर सीरियाचे सुमारे एक हजार सैनिक मारले गेले होते.

इस्राइलची योजना

या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी इस्राइलने पूर्ण विचार करुन योजना तयार केली होती. सर्व राष्ट्रांनी मिळून आपल्यावर हल्ला करण्याची वाट पाहण्यापेक्षा, पहिला वार आपणच करावा असं इस्राइलने ठरवलं होतं. यामुळेच संधी मिळताच इस्राइलने इजिप्तच्या फायटर प्लेन्सवर हल्ला सुरू केला होता. याच वेळी इस्राइलच्या लष्कराने जॉर्डनच्या हद्दीत घुसून शत्रूच्या सैनिकांवार हल्ला सुरू केला होता.

यानंतर कित्येक वर्षांच्या कालावधीत इस्राइलवर छोटे-मोठे हल्ले होतच राहिले. मात्र प्रत्येक वेळी या देशाने सर्व हल्ले परतवून लावले आहेत. 'आयर्न डोम' प्रणाली तैनात केल्यापासून तर इस्राइलला शेजारी देश आणखीनच टरकून आहेत. इस्राइलच्या सीमेवरील हवाई हद्दीतून देखील जाताना आता शेजारील राष्ट्र दोन वेळा विचार करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT