israel palestine conflict Hamas Attack On Music festival 260 Killed in videos go viral marathi news  Esakal
ग्लोबल

Israel Palestine Conflict : म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मृत्यूचं तांडव! हमासने 260 जणांना केलं ठार; लोकांचे जीव वाचवून पळतानाचे व्हिडिओ व्हायरल

Videos of people running to save their lives go viral: या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रोहित कणसे

इस्त्राइल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध पेटलं आहे.याच्या झळा अनेक सामान्य नागरिकांना बसत आहेत. हमासने केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हमासने नोव्हा म्युझिक फेस्टिव्हल (Nova Music Festival) वर केलेल्या हल्ल्याचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. हमासच्या या हल्ल्यात सुमारे 260 लोक मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी गाझा जवळील किबुट्झ रीइम (Kibbutz Re'im) जवळ हा म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता.

ज्यूंचा सण सुक्कोट (Sukkot)च्या समाप्तीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. इस्रायली रेस्क्यू सर्व्हिस झाका (Zaka) ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या म्युझिक फेस्टिव्हलच्या ठिकाणाहून 260 मृतदेह बाहेर काढले आहेत.

दहशतवाद्यांनी या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्यांना घेरले आणि गोळीबार करत कित्येकांना ठार केले. यानंतर, दहशतवादी परिसरात लपलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ठार केलं. तसेच अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं, असे द टाइम्स ऑफ इस्रायल वृत्तापत्राने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT