Air India sakal
ग्लोबल

Operation Ajay: ठरलं! इस्राइलमध्ये अडकलेले भारतीय लवकरच मायदेशात परतणार; विमानाचं 'या' दिवशी उड्डाण

इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या बचावासाठी गेलेलं भारत सरकारचं विमान लवकरच मायदेशात परतणार आहे. हे विमान कधी आणि किती वाजता उड्डाण करणार याचा तपशील समोर आला आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Israel Palestine conflict Operation Ajay first flight will depart today in the evening)

18000 भारतीय अडकले

विविध कारणांसाठी इस्राइलमध्ये वास्तव्याला असलेले १८,००० भारतीय नागरिक सध्या तिकडे अडकून पडले आहेत. या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या हमास या अतेरिकी गटानं इस्रायलवर ड्रोन हल्ले केल्यानंतर इथं युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारनं नुकतीच 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली. (Latest Marathi News)

'या' दिवशी निघणार पहिलं विमान

या ऑपरेशन अजयनुसार पहिलं विमान इस्राइलमध्ये दाखल झालं आहे. तसेच जे भारतीय नागरिक इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत त्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं आहे. या भारतीयांना मायदेशात घेऊन येणारी विमानाची पहिली खेप आज संध्याकाळी इस्रायलची राजधानी तेल अविव इथून उड्डाण करणार आहे. (Marathi Tajya Batmya)

जयशंकर यांचं आवाहन

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन ऑपरेशन अजय संदर्भातील माहिती दिली होती. ते म्हणाले की, "परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आले आहे. एक विशेष विमान आणि इतर सेवा यांची सोय करण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत" असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT