Israel  esakal
ग्लोबल

Israel Killed Hamas Commanders : इस्रायली सैन्याने घेतला ७ ऑक्टोबरचा बदला; हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या पाच कमांडर्सचा केला खात्मा!

Israel retaliation: इस्रायली सैन्याने एक्सला या सर्व कुख्यात दहशतवाद्यांच्या हत्येबद्दल माहिती शेअर केली आहे

Mayur Ratnaparkhe

Hamas Top Five commanders killed: तेल अवीववर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हमास दहशतवादी हल्ल्याचा, इस्रायली सैन्याने आणखी एक मोठा बदला घेतला आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ही कारवाई IDF आणि ISA यांनी संयुक्तपणे केली आहे.

इस्रायली सैन्याने या हल्ल्यात ५ सर्वात भयानक दहशतवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या बैत हानून बटालियनचा उपकमांडर मुराद नासिर मुसा अबू जरदचे नाव समाविष्ट आहे.

तसेच गाझा शहरातील इस्लामिक जिहादच्या अँटी-टँक युनिटचा उपप्रमुख महमूद शुक्री तैयम हा देखील हल्ल्यात मारला गेला आहे. याशिवाय, मोआत्सिम निदाल अहमद सखलवी यांनाही इस्रायली सैन्याने मारले आहे.

तो PIJ दहशतवादी संघटनेत कंपनी कमांडर म्हणून काम करत होता. तो बैत हानून बटालियनचा ऑपरेटर देखील होता. यासोबतच, हमासचा दहशतवादी आणि बैत हनौन बटालियनमध्ये रॉकेट आणि मोर्टार हल्ल्यांचा प्रमुख असलेला अहमद अब्दुल्ला अतामना देखील मारला गेला आहे. चक या हल्ल्यात आयडीएफने हमासचा आणखी एक कुख्यात दहशतवादी इस्माईल इब्राहिम अब्दुल्ला नईम यालाही मारले आहे, जो बैत हनौनच्या स्नायपिंग स्क्वॉडचा प्रमुख होता.

इस्रायली सैन्याने एक्सला या सर्व कुख्यात दहशतवाद्यांच्या हत्येबद्दल माहिती शेअर केली आहे. सैन्याने सांगितले की ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

Latest Marathi News Updates: देश-विदेशात आज दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT