Lavender AI Used In Israel Hamas War Esakal
ग्लोबल

Viral Video: आता युद्धातही AI! गाझावर हल्ले करण्यासाठी इस्त्रायलनं नेमकं काय केलं? धक्कादायक अहवाल समोर

Lavender AI: इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या टूलला 'लॅव्हेंडर' म्हणतात. 'लॅव्हेंडर'च्या मदतीने त्रुटीची शक्यता खूप कमी होते.

आशुतोष मसगौंडे

Use Of AI In Israel-Hamas War:

गेल्या अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत हजारो निष्पाप लोक या युद्धाला बळी ठरले आहेत. इस्त्रायल सातत्याने हमासच्या दहशवाद्यांवर लष्करी कारवाई करत आहे.

दरम्यान हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये संयुक्त राष्ट्र तसेच अमेरिकेनेही पुढाकार घेतला आहे. परंतू, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

या सर्व घडामोडींदरम्यान अशा बातम्या समोर येत आहेत. ज्याने सर्वांना धक्का बसेल. एका पत्रकाराने केलेल्या दाव्यानुसार गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) मदत घेत आहे. इस्रायलच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हमासवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या AI-आधारित उपकरणाचे नाव 'लॅव्हेंडर' आहे. यामध्ये 10 टक्के त्रुटीही होत्या.

त्याच वेळी, एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, मशीन रबर स्टॅम्पप्रमाणे काम करते. ती पहिल्या व्यक्तीला ओळखायची आणि 20 सेकंदात हल्ला करायची.

इस्रायली संरक्षण दलाला याबाबत विचारले असता त्यांनी हा दावा नाकारला. संशयित दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी एआयचा वापर केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या टूलला 'लॅव्हेंडर' म्हणतात. 'लॅव्हेंडर'च्या मदतीने त्रुटीची शक्यता खूप कमी होते.

अहवालानुसार, इस्रायलच्या लष्कराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलेली माहिती यंत्रणा दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी केवळ एक साधन असल्याचे सांगितले. युद्धादरम्यान नागरिकांचे कमी नुकसान व्हावे यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.

इस्रायलच्या लष्करी कारवाईची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने तपासणी होत असताना हा अहवाल समोर आला आहे. खरं तर, इस्त्रायलवर त्याच्या लक्ष्यित हवाई हल्ल्यांमध्ये पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये अन्न पोहोचवणाऱ्या अनेकांना ठार मारल्याचा आरोप आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये आतापर्यंत 32,916 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्तर गाझामधील लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांश लोक उपासमारीने त्रस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT