Israel War Update eSakal
ग्लोबल

Israel War Update : "आमच्या सैनिकांना पूर्ण सूट.. गाझा पहिल्यासारखं राहणार नाही"; इस्राइलचे संरक्षण मंत्री कडाडले!

Gaza Stripe : योआव गॅलंट यांनी हमासला गाझा पट्टीतील इसिस असंही म्हटलं.

Sudesh

शनिवारी हमास दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून इस्राइलवर हल्ला केला होता. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा करत हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आपण आपल्या सैनिकांना पूर्णपणे सूट देण्यात आली असून, गाझा पट्टी आता पहिल्यासारखी राहणार नसल्याचं इस्राइलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

"जे कोणी इथे आमच्या नागरिकांची हत्या करण्यासाठी येईल, महिलांची हत्या करेल, त्याला आम्ही पूर्णपणे संपवून टाकू. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही." असं योआव गॅलंट यांनी इस्राइल-गाझा पट्टीच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना सांगितलं.

गाझा पट्टीचा चेहरा बदलणार

"हमासला गाझा पट्टीमध्ये बदल हवा होता. त्यांना जो बदल अपेक्षित आहे, त्याच्या 180 अंश वेगळा बदल आम्ही त्यांना दाखवून देऊ. त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होईल. गाझा पट्टी आता पुन्हा पहिल्यासारखी होणार नाही." असंही गॅलंट यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हमासला गाझा पट्टीतील इसिस असंही म्हटलं.

गॅलंट यांनी मंगळवारी इस्राइल सैन्याच्या गाझा डिव्हिजन हेडक्वार्टर्सला भेट दिली. यावेळी त्यांनी शॅलडाग फायटर्स, पॅराट्रूपर्स आणि सैनिकांशी संवाद साधला. शनिवारी हमासने हल्ला केलेल्या पहिल्या काही लष्करी तळांपैकी एक असलेल्या किब्बुट्झ बेरी तळाला त्यांनी भेट दिली.

"काही महिन्यांनी आपण बेरीमध्ये परत येऊ, आणि तेव्हा परिस्थिती एकदम वेगळी असेल. किब्बुट्झला आपण शेवटच्या मीटरपर्यंत ताब्यात घेऊ आणि गाझामध्ये जे झालं ते पुन्हा होणार नाही" असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT