Accenture  Sakal
ग्लोबल

Accenture Layoff : IT क्षेत्रात नोकरी कपातीचं वादळ; Accenture मधल्या १९,००० लोकांच्या नोकऱ्या जाणार

गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात वाढती महागाई, वाढते व्याजदर आणि मागणीतल्या मंदीमुळे आयटी क्षेत्रामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Accenture ने आपल्या वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाज घेत २.५ टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं सांगितलं. बिघडत चाललेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनामुळे अनेक कंपन्या आपल्या तंत्रज्ञानाधारित सेवांवरचा खर्च कमी करत आहे. Accenture ने १९,००० नोकऱ्या कपात करण्यात येणार असल्याचं आता सांगितलं आहे. (Accenture Layoff)

गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात वाढती महागाई, वाढते व्याजदर आणि मागणीतल्या मंदीमुळे आयटी क्षेत्रामध्ये लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. Accenture ची प्रतिस्पर्धी कंपनी Cognizant ने गेल्या महिन्यात व्यवहारांमधली खुंटलेली वाढ निदर्शनास आणून दिली होती. तसंच आपला तिमाहीतला महसूल अपेक्षेपेक्षाही कमी असेल, असं सांगितलं होतं.

IBM आणि टाटा कन्सल्टन्सी या कंपन्यांनीही युक्रेन युद्धामुळे फटका बसलेल्या युरोपमध्ये मंदी आल्याचं सांगितलं. तसंच त्यामुळे ग्राहक खर्च करण्यात हात आखडता घेत असल्याचंही या कंपन्यांचं म्हणणं आहे. Accenture च्या वार्षिक महसूलात आता ८ ते १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT