Carlo Acutis 
ग्लोबल

Carlo Acutis: संगणकतज्ज्ञ असलेल्या 15 वर्षीय मुलाला बहाल केलं संतपद! पोप फ्रान्सिस यांचा मोठा निर्णय

कार्लोने दोन चमत्कार केल्याचं मान्य केल्यानं तो संतपदासाठी पात्र ठरला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लंडन : लंडनमध्ये जन्मलेल्या कार्लो ॲक्युटिस या पंधरा वर्षांच्या मुलाला मरणोत्तर संतपद मिळणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी हा निर्णय घेतला आहे. कार्लो संगणकतज्ज्ञ होता. ऑनलाइन पद्धतीने कॅथॉलिक पंथाचा प्रसार करण्यासाठी त्याने अनेक संकेतस्थळांची निर्मिती केली होती.

कार्लो हा कॅथॉलिक चर्चचा पहिला ‘मिलेनियल संत’ ठरणार आहे. ज्या मुलांचा जन्म १९८० ते १९९० च्या दशकात झाला आहे, त्यांना ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणतात. कार्लोचा जन्म ३ मे १९९१ रोजी लंडनमध्ये झाला होता.नंतर त्याचे वास्तव्य इटलीतील मिलानमध्ये होते. २००६ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाने त्याचे निधन झाले. एवढ्या लहान वयात त्याने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी संकेतस्थळांची निर्मिती केली होती. व्हॅटिकन संबंधित संस्थेसाठी त्याने काम केले होते. ‘गॉड्स एन्फ्लुएन्सर’ आणि ‘इंटरनेटचा संत’ अशीही त्याची ओळख होती.

व्हॅटिकनच्या संतपद देणाऱ्या विभागाचे प्रमुख कार्डिनल मार्सेलो सेमेरारो यांच्याशी झालेल्या बैठकीत फ्रान्सिस यांनी कार्लोला संतपद बहाल करण्याचा निर्णय घेतला, असे पोप यांच्यावतीने गुरुवारी (ता.२३) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पण हा कार्यक्रम कधी होईल, याबद्दल व्हॅटिकनने काहीही स्पष्ट केले नाही.

दोन चमत्कार केले

कार्लोने दोन चमत्कार केल्याचेही मान्य करण्यात आल्याने तो संतपदासाठी पात्र ठरला आहे. केवळ देवच चमत्कार करतो,अशा शिकवण रोमन कॅथोलिक चर्चकडून दिली जाते. पण स्वर्गात देवाबरोबर जे संत असतात आणि लोकांच्यावतीने देवाची प्रार्थना करतात, ते चमत्कार करू शकातात, असा समज या पंथात आहे. एखाद्या व्यक्तीवर वैद्यकशास्त्राच्या पलिकडे जाऊन उपचार करण्यास चमत्कार मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT