Shinzo Abe Death News Sakal
ग्लोबल

Shinzo Abe Death: भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात शिंजो आबे यांचं निधन

भाषणादरम्यान त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.

सकाळ डिजिटल टीम

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात त्यांचे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध होते. (Shinzo Abe Passed Away)

NHKया जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकाराने या ठिकाणी गोळी झाडल्यासारखा आवाज ऐकला आणि शिंजो आबे (Shinzo Abe) जखमी झाल्याचंही पाहिलं. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी जपानमधल्या नारा शहरात ते एका सभेमध्ये भाषण करत होते.

या भाषणादरम्यान त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

या संशयिताने भाषणादरम्यान मागच्या बाजूने गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे. या संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची बंदूकही जप्त कऱण्यात आली आहे. हा हल्लेखोर ४० वर्षांचा आहे. शिंजो आबे यांचे भारताशी घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात चारवेळा भारताला भेट दिली आहे. शिंजो आबे ६७ वर्षांचे असून आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT