japan Olympic TRT NEWS
ग्लोबल

जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, 1 टक्के लसीकरण; तरीही 'ऑलिंपिक'चा घाट

सकाळ वृत्तसेवा

टोकियो- जपानमध्ये कारोनाची चौथी लाट ((japan fourh corona wave ) धडकलेली असताना सरकार मात्र ऑलिंपिक बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जपानमध्ये केवळ एक टक्केच (vaccination ) लसीकरण झाले असून लाखो डोस फ्रिजरमध्ये पडून आहेत. रुग्णालयातील जागेअभावी काही गंभीर रुग्णांना घरीच थांबावे लागत त्यांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. दरम्यान, जपानने आशियायी देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घातले आहेत. नवीन निर्बंध १४ मे पासूनच लागू झाले आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ देशांचा समावेश आहे. (japan fourh corona wave 1 percent vaccination still Olympic)

जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या रुग्णांना दवाखान्यात दाखल का केले नाही, याचे स्पष्टीकरण ओसाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाविलाजाने घरातच राहावे लागत आहे. ओसाका येथे चोवीस तासात कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळून आले तर टोकियोत हीच संख्या १०१० होती. गेल्या शुक्रवारी ओसाका नर्सिंग होममध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी भरतीसाठी वाट पाहणाऱ्या चौदा जणांचा मृत्यू झाला.जपानमध्ये आतापर्यंत ६,५१ ७०२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ११०६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७२०८० जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. पैकी १,१८९ रुग्ण गंभीर असल्याचे जपान आरोग्य विभागाने म्हटले आहे.

‘तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु’

दुसरीकडे जपानमध्ये एका वर्तमानपत्रात संपूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध करून देशातील लोक ‘राजकारणाला बळी’ पडत आहेत, असे म्हटले आहे. लस नाही, औषध नाही. आम्हाला श्‍वासाला भाला करून लढावे लागणार काय ? परिस्थितीत बदल झाला नाही तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु, असे सरकारवर टीका करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जपानमध्ये केवळ एकच टक्के लसीकरण झाले आहे. तरीही ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षितपणे पार पाडल्या जातील, असे पंतप्रधान सुगा सांगत आहेत. त्यामुळे खासदारांत नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT