Taiwan Earthquake Esakal
ग्लोबल

Taiwan Earthquake: तैवानमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, जपानलाही इशारा

Taiwan Earthquake: तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाची अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये गगनचुंबी इमारती कोसळताना दिसत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

तैवानची राजधानी तैपेई येथे आज बुधवारी जोरदार भूकंपाने हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होती. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की यानंतर तैवान आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळताना दिसत आहेत. भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाच मजली इमारत झुकल्याचे दिसत आहे.

भूकंपामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या भूकंपामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या सुनामी लाटा तीन मीटरपर्यंत उंच असू शकतात.

भूकंप का आणि कसे होतात?

वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. जेव्हा यामुळे गोंधळ निर्माण होतो तेव्हा भूकंप होतो.

तीव्रता कशी मोजली जाते?

भूकंप रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजे केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा! नियमित पावसाची दमदार एन्ट्री कधी? हवामान खात्याचा मोठा अंदाज

Vaibhav Sooryavanshi: ना कोहली ना धोनी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'हा' दिग्गज ठरला सुपरहिरो; ज्याने बाउन्सरचा थरार सोपा केला!

Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."

Afternoon Nap : पुण्यातली 'दुपारची झोप' खरंच फायदेशीर आहे का? वाचा काय सांगतात हृदयरोगतज्ज्ञ...

Latest Marathi News Live Update : सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT