Japan PM Esakal
ग्लोबल

Japan PM: जपानी पंतप्रधानांच्या मुलाने अधिकृत निवासस्थानी केली पार्टी, फोटो झाले व्हायरल अन् गमावाव लागलं पद

जपानी पंतप्रधानांच्या मुलाला कार्यकारी धोरण सचिव पदावरून निलंबित करण्यात आलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

जपानी पंतप्रधानांच्या मुलाला कार्यकारी धोरण सचिव पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा मोठा मुलगा शोतारो याने वडिलांच्या अधिकृत निवासस्थानी पार्टी केल्यामुळे त्याला कार्यकारी धोरण सचिव पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

शोतारो याने पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मित्र आणि नातेवाईकांसोबत पार्टी केल्याचे फोटो व्हायरल झाले. नंतर देशभरातून त्याच्यावर टीका होऊ लागली होती. यामुळे त्याचे वडील पंतप्रधान किशिदा यांनी त्याला पदावरून काढुन टाकलं आहे. यापूर्वीही त्यांच्या मुलावर पदाचा गैरवापर केल्याची टीका झाली होती.(Latest Marathi News)

दरम्यान पार्टीमधील व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शोतारो आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या पायऱ्यांवरती असलेल्या रेड कार्पेटवर पोझ देताना दिसुन येत आहे. तर एका फोटोमध्ये तो आपल्या वडिलांची नक्कल करत असल्यासारखेच दिसत आहे.(Latest Marathi News)

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले की, “पंतप्रधानांचे राजकीय सचिव या नात्याने जनतेसाठी ते एक जबाबदार व्यक्तीमत्त्व आहेत, त्याने केलेले हे कृत्य चांगले नाही. म्हणून मी त्याच्याकडून त्यांची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.” तसेच त्यांनी पुढे सांगितले की, गुरुवारी त्यांच्या मुलाच्या जागी दुसरे सचिव ताकायोशी यामामोटो यांची नियुक्ती केली जाईल.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT