An illustrative image highlighting the controversy surrounding missing Jeffrey Epstein files and the sudden deletion of a Donald Trump photo in the United States.

 

esakal

ग्लोबल

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Epstein documents removed : या फाईल्स एका दिवसापूर्वीच वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या होत्या, परंतु दुसऱ्याच दिवशी त्या पूर्णपणे गायब झाल्या.

Mayur Ratnaparkhe

Jeffrey Epstein Files Missing Sparks US Outrage :अमेरिकेत ‘जेफ्री एपस्टाईन फाईल्स’ भोवतीचा वाद वाढत असताना, आता अमेरिकेत खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DOJ) अधिकृत सार्वजनिक वेबसाइटवरून एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदपत्रे अचानक काढून टाकण्यात आली आहेत. ही घटना केवळ तांत्रिक चूक होती की महत्त्वाचे सत्य लपवण्याचा प्रयत्न होता, याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या फाईल्स एका दिवसापूर्वीच वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या होत्या, परंतु दुसऱ्याच दिवशी त्या पूर्णपणे गायब झाल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काढून टाकलेल्या रेकॉर्ड्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि घिसलेन मॅक्सवेल यांचा जेफ्री एपस्टाईनसोबतचा फोटो देखील होता. या फोटोमुळे हे संपूर्ण प्रकरण आणखी संवेदनशील बनले होते.

सार्वजनिक पोर्टलवरून काढून टाकण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टाईनच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि फाईल्स होत्या. यामध्ये त्यांच्या घरातील कलाकृती, फर्निचर आणि खासगीड्रॉवरचे फोटो होते. तर काही छायाचित्रे आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला.

ज्या फायली अचानक गायब झाल्यानंतर न्याय विभागाकडे प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही. कागदपत्रे चुकून हटवण्यात आली की जाणूनबुजून वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली हे विभागाने स्पष्ट केले नाही. या मौनामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीके अमेरिकेतील अनेक डेमोक्रॅटिक खासदारांनी हा मुद्दा सार्वजनिकरित्या उपस्थित केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की जेव्हा प्रकरण इतके गंभीर आणि हाय-प्रोफाइल असते तेव्हा कागदपत्रे गायब होणे, हे लोकशाही आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT