PM Modi US Visit eSakal
ग्लोबल

PM Modi US Visit : पंतप्रधान मोदींना मिळाल्या खास भेटवस्तू; पाहा बायडेन आणि फर्स्ट लेडी यांनी काय काय दिलं?

पंतप्रधान मोदींनी आपल्या आदरातिथ्यासाठी बायडेन दाम्पत्याचे आभार मानले.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या भेटीमध्ये यजमान बायडेन दाम्पत्य आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांना काही भेटवस्तू दिल्या.

अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन (First Lady Jill Biden) यांनी पंतप्रधान मोदींना २० व्या शतकाच्या सुरुवातीला तयार झालेली एक हँड-मेड बुक गॅली दिली. तर, राष्ट्राध्यक्ष जो (Joe Biden) बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना एक व्हिंटेज अमेरिकी कॅमेरा गिफ्ट केला.

यासोबतच, जॉर्ज इस्टमॅनच्या पहिल्या कोडॅक कॅमेऱ्याचं पेटंटची अभिलेखीय प्रतिकृती आणि अमेरिकन वन्यजीव छायाचित्रण असलेले हार्डकव्हर पुस्तक हेदेखील बायडेन यांनी मोदींना भेट म्हणून दिले. अधिकृत भेटवस्तू म्हणून जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi received Gifts) 'रॉबर्ट फ्रॉस्टच्या संग्रहित कविता' या पुस्तकाची पहिली आवृत्ती भेट दिली. या पुस्तकावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांची स्वाक्षरीही आहे.

पंतप्रधानांनी मानले आभार

पंतप्रधान मोदींनी आपल्या आदरातिथ्यासाठी बायडेन दाम्पत्याचे आभार मानले. "मला व्हाईट हाऊसला बोलावल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, आणि प्रथम महिला जिल बायडेन यांचे आभार मानतो. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली." अशा आशयाचं ट्विट मोदींनी केलं आहे.

मोदींनीही दिल्या भेटवस्तू

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही बायडेन दाम्पत्यावर भेटवस्तूंचा वर्षाव केला. मोदींनी श्रीमती बायडेन यांना तब्बल ७ कॅरेटचा हिरा दिला. यासोबतच एक चांदीचा गणपती, उपनिषदांची प्रत, चंदनाचा बॉक्स अशा भेटवस्तू पंतप्रधानांनी जो बायडेन यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT