putin biden.j 
ग्लोबल

'किलर' पुतिन यांना किंमत चुकवावी लागेल; बायडेन यांच्या वक्तव्यानंतर रशियाचं कठोर पाऊल

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- रशिया आणि अमेरिका या दोन देशांमधून विस्तवही जात नाही. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वक्तव्यामुळे हे संबंध टोकाला जाणार आहेत. रशियाने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अमेरिकेतील आपल्या राजदूताला मॉस्कोमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. रशियाने 2020 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. शिवाय माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा सत्तेवर यावे यासाठीच पुतिन झटत होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्वावर एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.' अमेरिकेकडून आलेल्या या  वक्तव्यानंतर रशियाने आपल्या राजदूताला चर्चेसाठी मॉस्कोमध्ये बोलावले आहे. रशियाचे हे एक मोठे राजनैतिक पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करणे, प्रतिस्पर्धी अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करणे आणि अनेक विरोधकांना संपवणे, साबयर अटॅक करणे असे अनेक आरोप रशियावर करण्यात आले आहेत. याविषयी बोलताना बायडेन म्हणाले की, पुतिन यांना याची किंमत चुकवावी लागेल. तसेच आपल्या विरोधकांना संपवणारे पुतिन एक 'किलर' आहेत. बायडेन यांच्या वक्तव्यावर मॉस्कोने तीव्र नाराजी वक्त केली आहे. अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधात कधीही भरुन न निघणारी हानी होऊ शकते, असं रशियाने म्हटलंय. 

राजकीय विरोधक अॅलक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग केल्याप्रकरणी अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तेव्हापासून रशियानेही अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत यावे यासाठी रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातो. त्यात आता अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांनी रशियाच्या अध्यक्षांच्या विरोधात तिखट शब्दांचा वापर केला असल्याने दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडणार आहेत. तसेच बायडेन यांची रशियासंबंधीची भूमिका त्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाली आहे.

रशियाचे डेप्युटी परराष्ट्र मंत्री सर्गेई रॅबकॉव Sergei Ryabkov यांनी सांगितलं की, अमेरिका आणि रशियामधील संबंध चिघळले गेले तर त्यासाठी अमेरिकेची सर्वस्वी जबाबदारी असेल. दुसरीकडे अमेरिकेने म्हटलंय की, रशियाच्या प्रत्येक पाऊलावर अमेरिका लक्ष ठेवून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने पुतिन यांच्यासंबंधी तिखट शब्दांचा वापर टाळला होता. पण, बायडेन सरकारने रशियाविरोधात सॉफ्ट भूमिका न ठेवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT