Johannesburg Firing in bar 14 killed and three injured South Africa Johannesburg Firing in bar 14 killed and three injured South Africa
ग्लोबल

South Africa : जोहान्सबर्गमधील बारमध्ये गोळीबार; १४ जण ठार

सकाळ डिजिटल टीम

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये (bar) हा गोळीबार झाला. (Johannesburg Firing Marathi News)

पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती. येथे काही लोकांचा एक गट मिनिबस टॅक्सीत आला आणि बारच्या रक्षकांवर गोळीबार केला. घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरूनही गोळीबारात (Firing) एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे दिसून येते, असे गौतेंग प्रांताचे पोलिस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले.

ज्या बारमध्ये (bar) गोळीबार झाला तो परवानाधारक आहे. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. मात्र, आरोपींच्या गोळीबारामागील (Firing) हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही, असेही पोलिस कर्मचारी इलियास मावेला यांनी सांगितले.

अमेरिकेत रोज घडणाऱ्या घटना!

अमेरिकेत अशा घटना रोज घडतात. ५ जुलै रोजी अमेरिकेतील इंडियाना येथे झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी १० जणांना गोळ्या घातल्या. ही घटना ब्रेनियानाच्या गॅरीची होती. ब्लॉक पार्टीत ही घटना घडली होती. याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये गोळीबार झाला होता. फ्रीडम परेडमधून बाहेर पडत असताना अचानक गोळीबार झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर २४ जण जखमी झाले होते. हल्लेखोराने छतावरून गोळ्या झाडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT