johnny depp amber heard defamation case jury order compensatory punitive damages Washington sakal
ग्लोबल

चुकी नंतरही जॉनी डेपचा ‘विजय’

माजी पत्नीविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात दंडापेक्षा भरपाई अधिक

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘पायरेट्‌स ऑफ कॅरेबियन’ या चित्रपटांच्या मालिकांचा अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री अंबर हर्ड या जोडीने एकमेकांविरोधात केलेल्या मानहानीच्या खटल्याचा निकाल आज लागला असून न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत दोघांनाही दंड ठोठावला आहे. मात्र, जॉनी डेपला अधिक नुकसानभरपाई मंजूर झाल्याने त्याचाच या खटल्यांमध्ये विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड या हॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडीचा हा खटला बराच गाजला. न्यायालयाने निकाल देताना, अंबरने जॉनी डेपला नुकसानभरपाई म्हणून एक कोटी डॉलर आणि दंडात्मक शिक्षा म्हणून आणखी ५० लाख डॉलर देण्याचा आदेश दिला. तर, जॉनीनेही अंबरला वीस लाख डॉलर नुकसानभरपाई द्यावी, असे न्यायालयाने सांगितले. जॉनीवर दंडात्मक कारवाई झाली नाही. या निकालावेळी अंबर न्यायालयात हजर होती. निकालानंतर मान खाली घालून ती निघून गेली, तर न्यायालयात उपस्थित नसलेल्या जॉनी डेप याने ‘न्यायालयाने मला माझे आयुष्य परत दिले,’ अशी प्रतिक्रिय दिली. या निकालाला आव्हान देण्याचा अंबर हिचा विचार असल्याचे तिच्या वकीलांनी सांगितले. जॉनी डेप आणि अंबर यांची २००९ ला भेट झाली होती आणि २०१५ ला त्यांचा विवाह झाला होता. २०१६ला ते विभक्त झाले.

काय होता खटला?

घटस्फोट झाल्यानंतर अंबर हिने २०१८ मध्ये ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला एक लेख लिहित आपण कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडल्याचा दावा केला होता. या लेखात जॉनी डेपचे नाव नसले तरी यामुळे अनेक चित्रपटांमधील महत्त्वाच्या भूमिका हातातून निसटल्याचा दावा करत त्याने अंबरविरोधात अब्रुनुकसानीचा खटला भरला. जॉनीच्या वकिलांनी या आरोपांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल अंबरनेही जॉनीविरोधात मानहानीचा खटला भरला होता. जॉनीने पाच कोटी डॉलरचा दावा केला होता, तर अंबरने १० कोटी डॉलरचा दावा केला.

माझी नाराजी शब्दांत व्यक्त करता येणार नाही. ढिगभर पुरावे असतानाही ते जॉनी डेपच्या प्रभावासमोर टिकाव धरू शकले नाहीत.

- अंबर हर्ड, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT