Foreign Ministers of Quad Countries with Australian prime minister टिम ई सकाळ
ग्लोबल

भारत ऑस्ट्रेलियासह जपाननं उत्तर कोरियाला झापलं; 26/11 सह पठाणकोटचा दिला दाखला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले आहे यावर ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानचे परराष्ट्र मंत्री आणि युनायटेड स्टेट्सचे सचिव यांनी संयुक्त निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले आहे यावर ऑस्ट्रेलिया (Australia), भारत आणि जपानचे (Japan) परराष्ट्र मंत्री (Foreign Ministers) आणि युनायटेड स्टेट्सचे सचिव यांनी संयुक्त निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे (UNSCRs) उल्लंघन करून उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले आहे, याचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या संयुक्त निवेदनात म्हटले आहे “26/11 मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यांसह भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही UNSC ठरावाला 2593 (2021) खात्री देतो की अफगाण भूभागाचा वापर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी करणार नाही.”

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भूमीचा वापर हा कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी अथवा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होऊ नये, असा ठराव भारताच्या अध्यक्षतेखालील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने सोमवारी मंजूर केला होता. अफगाणी आणि सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित देशाबाहेर पडू दिले जाईल, हे आश्वासन तालिबान्यांनी पाळावे, अशी अपेक्षाही या ठरावात व्यक्त करण्यात आली होती. भारताच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशीच हा ठराव संमत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT